नवापुरात 42 जणांनी केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 12:17 IST2019-07-26T12:16:47+5:302019-07-26T12:17:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : शहरातील उपजिल्हा रुग्णालयात घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 42 जणांनी रक्तदान केले.  नवापूर उपजिल्हा रुग्णालय ...

42 donated blood in Navapur | नवापुरात 42 जणांनी केले रक्तदान

नवापुरात 42 जणांनी केले रक्तदान

लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : शहरातील उपजिल्हा रुग्णालयात घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 42 जणांनी रक्तदान केले. 
नवापूर उपजिल्हा रुग्णालय व नंदुरबार येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढींच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी रक्तदान शिबिर घेण्यात आले. शिबिराचे उद्घाटन गरोदर माता सारिका वाघरी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून वैद्यकीय अधीक्षक डॉ.किर्तीलता वसावे, नंदुरबार येथील प्रशासकीय अधिकारी डॉ.कांचन वसावे, वैद्यकीय अधिकारी डॉ.भानुदास गावीत, डॉ.प्रमोद कटारिया, डॉ.रेचल वळवी, डॉ.अमोल जाधव, डॉ.प्रीती गावीत, अक्षित अग्रवाल उपस्थित होते.
डॉ.किर्तीलता वसावे यांनी उपजिल्हा रुग्णालयात प्रसूती व सिजेरियन बाळंतपणासाठी येणा:या माता आणि सिकलसेल ग्रस्त रुग्णांना रक्तपुरवठा केंद्रामार्फत आवश्यक रक्तांचा पुरवठा करण्यात येतो, अशी माहिती दिली. रक्तदान केल्याने कोणतेही दुष्परिणाम होत नाही, त्याचा शरीराला फायदाच होत असल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करावे, असे आवाहन केले. याप्रसंगी समुपदेशक कैलास माळी यांनी एचआयव्ही एड्स व सिकलसेल विषयी माहिती दिली. 
शहरातील विविध संस्थेतील कार्यकर्ते, नागरिक, रुग्णालयातील अधिकारी व कर्मचा:यांनी रक्तदान केले. रक्तदात्यांना प्रव्रुत्त करण्याचे कार्य बजरंग भंडारी व लाजरस गावीत यांनी तर रक्त संकलनाचे कार्य जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीतील महेंद्र चव्हाण, राजदीप वाघ, हेमंत माळी, भरत वसावे, प्रवीण ठाकूर व अहमद पिंजारी यांनी केले. शिबिरासाठी चंद्रकांत पावरा, अश्विनी वसावे, रवींद्र पिंपळे, दिनेश अहिरराव, विजय देवकर व सुनील गावीत यांनी परिश्रम घेतले.

सामाजिक भान जपतांना शहरातील अजय पद्माकर गावीत यांनी उपजिल्हा रुग्णालयात 44 व्या वेळी रक्तदान केले. त्या निमीत्ताने त्यांच्या रक्तदान कायार्चा गौरव करण्यात आला. रक्तदान श्रेष्ठदान असे म्हटले जाते. रक्तदानाचे महत्व जाणून असलेले अजय गावीत इतरांनाही रक्तदानाचे महत्व पटवून सांगतात व रक्तदानासाठी प्रवृत्तही करतात. अशा विविध क्षेत्रात कार्य करणा:या व्यक्तींमुळेच नवापुरच्या नावलौकिकात भर पडत आहे.
 

Web Title: 42 donated blood in Navapur