शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

कागदपत्रांअभावी 385 प्रकरणे नामंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 12:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : संजय गांधी समितीची बैठक मंगळवारी प्रशासकीय इमारतीत घेण्यात आली. समितीकडे इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : संजय गांधी समितीची बैठक मंगळवारी प्रशासकीय इमारतीत घेण्यात आली. समितीकडे इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ व संजय गांधी निराधार योजनेचे साधारण सव्वा चारशे प्रकरणे दाखल करण्यात आली होती. त्यापैकी 385 प्रकरणे विविध कागद पत्रांच्या पूर्ततेअभावी              नामंजूर करण्यात आली आहेत. वेगवेगळ्या त्रुटींमुळे एवढय़ा मोठय़ा प्रमाणात प्रकरणे नामंजूर झाल्याने प्रशासनाने कागद पत्रांसाठी कर्मचा:यांना सक्त ताकीद देण्याची आवश्यकता आहे.तळोदा तालुकास्तरीय संजय गांधी समितीची बैठक मंगळवारी येथील मध्यवर्ती प्रशासकीय  इमारतीत घेण्यात आली. अध्यक्षस्थानी आमदार उदेसिंग पाडवी होते. या वेळी समितीचे सचिव तहसीलदार पंकज लोखंडे, नायब तहसीलदार एस.पी. गवते, सदस्य नितीन पाडवी, अनुप उदासी, रशिलाबाई देसाई, यशवंत पाडवी उपस्थित होते. या समितीकडे तालुक्यातील ग्रामीण भागातील लाभार्थ्ीकडून साधारण सव्वाचारशे प्रकरणे दाखल करण्यात आली  होती. यात इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ योजनेसाठी 268 प्रकरणे तर संजय गांधी निराधार योजनेकरीता 146 प्रकरणांचा समावेश होता. समितीच्या सदस्यांनी या सर्व दाखल प्रकरणांची सखोल पडताळणी केल्यानंतर केवळ 39 प्रकरणे मंजूर केली आहेत. 45 प्रकरणे नामंजूर तर तब्बल 330 प्रकरणांमध्ये विविध कागद पत्रांची पूर्तता व त्रुटीमुळे नाकारण्यात आली आहेत. नाकारण्यात आलेल्या म्हणजे त्रुटी आढळून आलेल्या प्रकरणांबाबत समितीने कागदपत्रांची पूर्तता  आपल्या कर्मचा:यांमार्फत करून घेण्याची सूचना समितीने प्रशासनास दिली आहे, असे असले तरी मोठय़ा प्रमाणात दाखल झालेल्या प्रस्तावांमध्ये कागद पत्रांची त्रुटी आढळून आल्यामुळे ती नामंजूर करण्यात आली आहेत. साहजिकच प्रशासनाने याप्रकरणी गंभीर दखल घेण्याची आवश्यकता आहे. कारण नागरी सुविधा केंद्रांमध्ये लाभार्थी कागद पत्रांची पूर्तता करून दाखल करीत असतात. तेव्हाच संबंधीतांनी पडताळणी केली तर अपूर्ण कागद पत्रांची पूर्तता करणे लाभार्थीस शक्य होईल. मात्र समितीत प्रकरणे दाखल होऊन त्रुटीमुळे पुन्हा              नामंजूर केले जाते. त्यानंतर पुन्हा महसूल कर्मचा:यांमार्फत लाभार्थीस त्रुटीची पूर्तता करावी लागत असते. आधीच लाभार्थीस रेशन कार्ड,  वयाचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड अशी डझनभर कागदपत्रांची जुळवणी करतांना अक्षरश: नाकेनऊ येत असते. शेवटी त्याची जुळवणी केल्यानंतर प्रस्ताव दाखल करतात. शिवाय दाखल करतांनादेखील सुविधा केंद्रातून पावतीसाठी  पदरमोड करावी लागते. एवढे करूनही जेव्हा त्रुटीच्या अभावामुळे प्रकरण नामंजूर होते तेव्हा लाभाथ्र्यास   निराश व्हावे लागत असल्याची  व्यथा लाभार्थ्ीनी या वेळी बोलून दाखविली.संजय गांधी योजनेच्या नवीन प्रशासनाने प्रकरण दाखल  करण्यापूर्वी आता लाभार्थ्ीनी या विभागाकडे कागद पत्रांची पूर्तता करून घेण्याची सूचना केली आहे. त्यामुळे लाभार्थ्ीनीदेखील त्यांच्याकडून आपली कागदपत्रांची पडताळणी करून घेण्याची आवश्यकता आहे. म्हणजे जेणे करून लाभाथ्र्याची दमछाक होणार  नाही.

संजय गांधी समितीकडे 425 प्रकरणे दाखल करण्यात आली होती. त्यात इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ व संजय गांधी निराधार या दोन्ही योजना मिळून 39 प्रकरणे पडताळणी अंती मंजूर करण्यात आली आहे. 45 प्रकरणे नामंजूर झाली असून, 330 प्रकरणांमध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत. त्याची तलाठींमार्फत लाभाथ्र्याकडून पूर्तता करण्यात येईल.