शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

ठिबक सिंचन योजनेसाठी ३६० अर्ज मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:26 IST

राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी ठिबक सिंचन योजना सुरू केली आहे. या योजनेत पीक वर्गवारीनुसार शेतकऱ्यांना ३० हजारांपासून ते ७० हजारांपर्यंत ...

राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी ठिबक सिंचन योजना सुरू केली आहे. या योजनेत पीक वर्गवारीनुसार शेतकऱ्यांना ३० हजारांपासून ते ७० हजारांपर्यंत शासनाचे अनुदान देण्यात येते. शासनाच्या कृषी विभागाच्या ऑनलाइन प्रणालीवर शेतकऱ्यांची निवड केली जाते. त्यानुसार शेतकरी आपली नोंदणी सुरुवातीस या वेबसाईटवर करतात. तळोदा तालुक्यातील ३६० शेतकऱ्यांच्या नोंदणीस शासनाने मान्यता दिली असून या शेतकऱ्यांनी आता लेखी प्रस्ताव आपल्या अनुदानासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करून येथील कृषी कार्यालयाकडे जमा करावेत कारण कागदपत्रांची संबंधितांकडून पडताळणी केल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयात पाठविण्यात येतील. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन कृषी कार्यालयाने केले आहे.

अनुदानासाठी शासनाने वेबसाईट सुरू केली असली तरी एकाच प्रणालीवर कृषी विभागाच्या डझनभर योजना सुरू केल्या आहेत. त्यामुळे गोंधळ उडत असल्याचे शेतकरी सांगतात. कधी साईट ओपन होत नाही तर कधी नेट कनेक्टीव्हीटीची समस्या निर्माण होते. त्यामुळे शेतकऱ्यांना संगणक केंद्रांवर अथवा सुविधा केंद्रांवर हेलपाटे मारावे लागतात. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना नेटच्या समस्येमुळे तळोदा येथेच यावे लागते. अशावेळी काम झाले नाही तर निराश होऊन परतावे लागते. यात त्यांचा वेळ व पैसा वाया जात असल्याची व्यथा शेतकरी मांडतात. त्यामुळे शासनाने याबाबत ठोस मार्ग काढावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

गेल्यावर्षीच्या अनुदानापासून शेतकरी वंचित

गेल्यावर्षी तळोदा तालुक्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांना ठिबक सिंचन योजनेचे अनुदान प्राप्त झाले नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. त्यांनी आपल्या एजंटामार्फत प्रस्ताव दाखल केल्याचे शेतकरी सांगतात. जवळपास २०० ते २५० शेतकऱ्यांना अनुदान प्राप्त झाले नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे कृषी कार्यालयाने याबाबत चौकशी करणे अपेक्षित आहे. कृषी कार्यालयाच्या अनुदानापासून एकही शेतकरी वंचित राहिला नसल्याचे सांगण्यात येत असले तरी त्याबाबत खात्री करावी. कारण शेतकऱ्यांनी ज्या डिलरकडून ठिबकचे साहित्य घेतो त्याच्यामार्फत कृषी विभागाकडे प्रस्ताव दखल करत असतो. साहजिकच या दोघांमधील समन्वयाअभावी नाहक शेतकरी भरडला जात आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी संबंधितांना बोलावून चौकशी करावी, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

चढ्या दराने युरियाची विक्री

तळोदा शहरात सध्या मुख्यतः युरिया शेतकऱ्यांना मिळत नसल्याने त्याची चढ्या दराने विक्री करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट केली जात आहे. २६० रुपयांना मिळणारी युरियाची थैली ३०० रुपयांना विक्री केली जात आहे. सध्या शेतकऱ्यांची केळी, पपई, ऊस या पिकांना खताची मात्रा देण्याची लगबग सुरू आहे. नेमकी युरियाचीच टंचाई भासत असल्याने ही संधी साधून व्यावसायिक आपले उखळ पांढरे करून घेत आहेत. कृषी विभागाने याप्रकरणी दखल घेण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.

गेल्यावर्षीचे ठिबक सिंचन योजनेचे अनुदान शेतकऱ्यांना देण्यात आले आहे. एकही प्रस्ताव शिल्लक नाही. तरीही ज्या शेतकऱ्यांची तक्रार आहे त्यांनी प्रत्यक्ष कार्यालयात येऊन खात्री करावी.

-अमोल बोरसे, कृषी सहायक, कृषी कार्यालय, तळोदा

गेल्यावर्षी शासनाच्या ठिबक सिंचन योजनेसाठी डीलरमार्फत प्रस्ताव दखल केला होता. त्यामुळे अजूनही अनुदानापासून उपेक्षित आहे. याबाबत चौकशी होऊन तातडीने अनुदान मिळावे.

-अरविंद मगरे, शेतकरी, तळोदा