शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
2
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
3
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
4
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
5
केरळ मुख्यमंत्रिपदाचा वाद काँग्रेसच्या हायकमांडच्या दरबारात, आठवडा उलटला तरी नाव निश्चित नाही
6
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
7
Petrol Diesel Price: जागतिक बाजारपेठेत इंधनाचा भडका! जगातील अनेक देशांत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले; भारताची नेमकी स्थिती काय?
8
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
9
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
10
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
11
विशेष लेख: भगव्या बंगालमध्ये सगळ्यांना ‘भाकरी’ मिळेल का?
12
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
13
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
14
अन्वयार्थ: न्यायालय म्हणते, बोगस दिव्यांग ‘काळी मेंढरे’ सेवेतून हाकला !
15
लेख: शहरांनी सुरळीत धावण्यासाठी त्यांच्या पायांना कसली चाकं हवीत?
16
अग्रलेख: युद्धाच्या झळा, काटकसरीच्या कळा
17
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
18
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
19
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
20
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
Daily Top 2Weekly Top 5

३५० वर्षाची लळीतोत्सवाची परंपरा यंदा खंडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 12:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : सारंगखेडा येथील गेल्या ३५० वर्षापासून सुरू असलेल्या लळीत उत्सवाची परंपरा या वर्षी खंडित झाली.ही ...

लोकमत न्यूज नेटवर्क
सारंगखेडा : सारंगखेडा येथील गेल्या ३५० वर्षापासून सुरू असलेल्या लळीत उत्सवाची परंपरा या वर्षी खंडित झाली.ही लळीत उत्सवाची परंपरा गेल्या ३५० वर्षापासून अविरत सुरू होती. यंदा गेल्या पाच महिन्यापासून जगभर कोरोना या विषाणुच्या महामारीने थैमान घातल्याने अनेक सण-उत्सव साध्यापद्धतीने साजरा करण्यात येत आहेत. याला लळीत उत्सव कसा उपवाद ठरणार.शासनाने यंदा लळीत उत्सव साजरा करू नये असे सूचविले व त्यानुसार यंदा फक्त पोथीचे वाचन मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत करण्यात आले.
शास्त्री कोषानुसार उत्सवाच्या अवसरावर नाटकांच्या अंकानुसार रूप घेवून अभिनय करणे म्हणजे लळीत होय. गुजरांना महाराष्टÑ प्रदेशाचा भुभाग असल्याने येथे गणेशोत्सव मोठ्या आनंदाने व भक्तिभावाने साजरा केला जातो. पाचव्या दिवशीच्या गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी रात्री सारंगखेडा येथे परंपरागत लोकनाट खेळले जाते. हे लोकनाट सारंगखेडा पुसनद, म्हसावद, कोळदा या गावांमध्ये आजही अवितर केले जाते. ३५० वर्षांपूर्वी लळीत उत्सवाची प्रसाद रूपात स्वामी नित्यानंद यांनी सारंगखेडा वासियांना दिल्याचे पूर्वज सांगतात. लळीत पोथीचे व पौराणिक प्रसंगाचे जे लोक गाऊन वाजवून अभिनयाद्वारे प्रकटीकरणाचे सादरीकरण करतील ते लोक दु:ख पीडा, अनारोग्यापासून दूर राहतील. याच श्रद्धेपोटी आजही लळीत नाट्याचे सादरीकरण करून लळीतोत्सव साजरा केला जातो. या उत्सवात लोकांच्या स्तरानुसार लोकभाषेत कथोपकथन असते. कर्थी शब्दप्रयोगाद्वारा व्यंग, विनोद, उपहास, हास्यनिर्मिती केली जाते. लळीत हे लोकनाट्य लोकांच्या बौद्धिक स्तरानुसार लोकांच्या मनोरंजनार्थ लोक शिक्षणाच्या हेतूने सामान्य लोककलांद्वारे प्रस्तुत केलेली कला असून, भक्तिभाव व श्रद्धेने परंपरागत चालत आलेला नाट्य प्रकार जी गुजरांची सांस्कृतिक व सामाजिक धरोहर असून, पुढच्या पीढीसाठी पूर्वजांचा वारसा जतन करून ठेवण्याचे महत्त्वाचे साधन आहे, असे डॉ.दिलीप पटले हे सांगतात.