शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

धडगाव तालुक्यात ५५ मतदान केंद्रे ३१० कर्मचारी रवाना ; पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचीही नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 13:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क धडगाव :  तालुक्यातील १६ ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराला बुधवारी विराम मिळाला. यांतर्गत गुरुवारी तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कधडगाव :  तालुक्यातील १६ ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराला बुधवारी विराम मिळाला. यांतर्गत गुरुवारी तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांच्या मार्गदर्शनात ५५ मतदान केंद्रांसाठी ३१० कर्मचा-यांना साहित्य वाटप करुन रवाना करण्यात आले. तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींच्या एकूण ५५ प्रभागात मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे.           तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींच्या ५५ प्रभागात निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. यातून अंतिम मुदतीत एकूण ४१६ अर्ज दाखल करण्यात आले होते. यातील ७९ जणांनी अर्ज माघारी घेतल्यानंतर एकूण ३३३ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. या उमेदवारांचा प्रचार बुधवारी थंडावला. दरम्यान तालुक्यातील धनाजे आणि भोगवाडे येथील प्रत्येकी दोन असे चार उमेदवार बिनविरोध झाले आहेत. यातून २५ हजार मतदार सज्ज झाले आहेत. १३ हजार ९२ पुरूष तर १२ हजार ६६्० महिला मतदार मतदान करणार आहेत. तालुक्यात तयार करण्यात आलेल्या ५५ मतदान केंद्रांसाठी ६२ पथके तैनात करण्यात आली आहेत. यातून 310 कर्मचारी प्रत्यक्ष मतदान केंद्रात पाच पथके राखीव ठेवण्यात आली आहे. मतदान केंद्रांसाठी सात पोलीस अधिकारी, ११४ पोलीस काॅन्स्टेबल, गृहरक्षक दलाचे ४५ जवान तैनात करण्यात आले आहेत. सर्व कर्मचा-यांना खाजगी वाहनांनी मतदान केंद्रांवर रवाना करण्यात आले आहे.               दरम्यान कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सर्वच कर्मचारी व मतदारांनी योग्य ती खबरदारी घेत सामाजिक अंतर राखून तोंडाला मास्क लावून मतदान केंद्रावर यावे मतदान केंद्रावर आल्यावर वर योग्य काळजी घ्यावी व मतदान केंद्रावर कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार घडणार नाही याचे भान राखूनच मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा असे तहसिलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांनी कळवले आहे. मतदान केंद्रावर कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार या कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घेतली जाईल ते टाळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून सर्वच मतदान केंद्रावर आमचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. संवेदशिल गावांत अधिक सुरक्षा पुरविण्यात आली असुन सर्वच केंद्रांवर आमची टीम नजर ठेवून असेल मतदारांनी देखील शांततेत मतदानाचा हक्क बजावावा असे धडगावचे पोलीस निरीक्षक दिलीप महाजन यांनी कळवले आहे.

तालुक्यात चार मतदान केंद्रे संवेदनशील तालुक्यातील घाटली, काकडदा, मुंदलवड, धनाजे बु्द्रुक येथील मतदान केंद्र संवेदनशील असल्याने गैरप्रकार टाळण्यासाठी त्याठिकाणी जादा पोलीस कुमक तैनात करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.