शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जनांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
3
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
4
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
5
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
6
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
7
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
8
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
9
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
10
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
11
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
12
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
13
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
14
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
15
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
16
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
17
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
18
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
19
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
20
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

शेवाळी-नेत्रंग महामार्गाला लावलेली ३० कोटींची ठिगळंही गेली खड्ड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 13:30 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ बी वरील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ...

 लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ बी वरील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने महामार्ग दुरुस्तीसाठी बांधकाम विभागाच्या महामार्ग प्राधिकरणाला तब्बल ३० कोटी रुपयांचा निधी दिल्यानंतर खड्डे बुजवण्यात या विभागाला अपयश आले आहे. रस्त्यावरचे खड्डे अद्यापही जैसे थे असल्याने प्रवास करावा तरी कसा असा प्रश्न वाहनधारकांना पडू लागला आहे. नंदुरबार जिल्ह्यातून तब्बल ११५ किलोमीटरपेक्षा अधिक अंतर कापणाऱ्या राष्ट्रीय महामार्गामुळे जिल्ह्याचा विकास होईल अशी अपेक्षा होती; परंतु विकासाऐवजी रस्ताच भकास झाल्याचे चित्र आहे. विस्तारीकरणाची प्रक्रिया रखडल्याने मार्गाची दुरुस्ती करण्याबाबतचे नियोजन गेल्या काही महिन्यात कोलमडले होते. यातून महामार्ग विभागाने केंद्राकडे निधीची मागणी करत रस्ता दुरुस्ती करण्याबाबत सूचित केले होते. यातून विभागाला ३० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. यांतर्गत नंदुरबार ते हातोडा पूल या दरम्यान ६ कोटी रुपये, तळोदा ते अक्कलकुवा १० कोटी तर अक्कलकुवा ते गुजरात हद्दीपर्यंत १३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. गेल्या महिन्यात मंजूर करण्यात आलेल्या या निधीतून विभागाने नियुक्त केलेल्या ठेकेदारांनी खड्डे भरत असल्याचे सांगितले होते. परंतु प्रत्यक्षात दीड महिना होऊनही रस्त्याचे काम योग्य पद्धतीने करण्यात आलेले नाही. खड्डा भरून त्यावर समतल डांबरीकरण करण्याची गरज असताना जागोजागी खडी टाकून त्यावर डांबर टाकून खड्डे बुजवले गेले आहेत. यातून खडी वर येऊन वाहने अक्षरश: त्यावर आदळत असल्याचे प्रकार सुरू झाले आहेत. याबाबत संबंधित विभागाचे अधिकारी हे काम सुरू असल्याची माहिती देत वेळ मारुन नेत आहेत. प्रत्यक्षात नंदुरबार ते वाका हा रस्ता खड्डे आणि तुटलेल्या साईडपट्ट्या यामुळे अपघाती ठरत आहे. तळोदा ते अक्कलकुवा येथेही अडचणी असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, अक्कलकुवा शहरात खड्डे बुजवले की खड्डे केले असे चित्र आहे. याकडे संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी आहे.याबाबत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकलेला नाही.