शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
3
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
4
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
5
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
6
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
7
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
8
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
9
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
10
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
11
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
12
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
13
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
14
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
15
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
16
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
17
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
18
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
19
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
20
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

मोलगीचे ३ पोलीस पॉझिटीव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 12:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : मोलगी येथील तीन पोलिस कर्मचाऱ्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तिघांना नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात ...

लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : मोलगी येथील तीन पोलिस कर्मचाऱ्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तिघांना नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. संपर्कातील १३ जणांना खापर येथील विलगीकरण केंद्रात पाठविण्यात आले आहे. दरम्यान, पोलीस दलात कोरोनाचा शिरकाव झाल्याने चिंता व्यक्त होत आहे.अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी येथील पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सह त्यांच्या कुटुंबातील तिघांना कोरोना ची लागण झाली होती. याच पोलिस ठाण्यातील अनुक्रमे ५२ ,४६, ३० वर्षीय पुरुष पोलीस कर्मचारी यांच्या कोरोना अहवाल काल रात्री उशिरा पॉझिटिव्ह आला. या पोलीस कर्मचाऱ्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या कुटुंबासह त्यांच्या संपर्कातील १३ जणांना खापर येथील संस्थात्मक विलगीकरण केंद्रात पाठविण्यात आले आहे. मोलगी पोलिस ठाण्यातील ३ कर्मचारी पॉझिटिव्ह आल्यामुळे मोलगी पोलीस ठाण्यातील कर्मचाºयांची तपासणी करण्यात येऊन पोलीस ठाण्यासह शहरांमध्ये ग्रामपंचायतीतर्फे निर्जंतुकीकरण करण्यात आले. मोलगी येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले काही पोलीस कर्मचारी अक्कलकुवा येथील पोलिस वसाहतीमध्ये राहत असल्यामुळे कर्मचारी वसाहत प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे.तहसीलदार सचिन मस्के, उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, निवासी नायब तहसीलदार विजयसिंग कचवे, पोलीस निरीक्षक मेघशाम डांगे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्निल मालखेडे, डॉ. सागर गयधर, ग्राम विकास अधिकारी तायडे, इरफान मकरानी आदीं उपस्थित होते.मोलगी मध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८ वर पोहोचली असून यातील सर्वाधिक रुग्ण पोलीस खात्यातील आहेत. पोलिसांमध्ये हा संसर्ग कसा वाढला याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. सातपुड्यात या आजाराचा प्रसार होणे जिल्हा तालुका प्रशासनासाठी भविष्यात अधिक चिंतेची बाब करणार आहे.कोरोना बाधीताच्या जवळच्या संपर्कातील १३ जणांना मांडवी, ता.धडगाव येथील विलगीकरण कक्षात दाखल कण्यात आले आहे. हे सर्व मोलगी येथील असल्याचे समजते. मांडवी विलगीकरण कक्षात प्रथमच विलगीकरणासाठी ठेवण्यात आले आहे. धडगाव तालुक्यात अद्याप एकही रुग्ण आढळून आलेला नाही. हा तालुका अद्यापही कोरोनामुक्त आहे. त्यामुळे मांडवी विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलेल्या हायरिस्क कॉन्टक्ट लोकांना ठेवण्यात आल्याने तालुक्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.स्वॅब अहवालांची प्रतीक्षा वाढली...स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या अहवालांची संख्या आणखी वाढली आहे. शनिवारी दिवसभरात एकुण ३२ अहवाल प्राप्त झाले. ते सर्व अहवाल निगेटिव्ह आल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. दिवसभरात २७ जणांचे स्वॅब घेण्यात आले. आता एकुण ७९ जणांचे अहवालांची प्रतिक्षा कायम आहे. सध्या जिल्हा रुग्णालयात ८९ जण उपचार घेत आहेत. तर ६० जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत एकुण १,९२४ जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. तर १,६६८ जणांचे स्वॅब निगेटिव्ह आले आहेत.