शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा सामान्य रुग्णालयात वर्षभरात २८ मातांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:31 IST

सातपुड्याच्या दुर्गम भागासह सपाटीच्या गावांचा समावेश असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात ६७ टक्के आदिवासी लोकसंख्या आहे. यातील निम्म्यापेक्षा अधिक जण हे ...

सातपुड्याच्या दुर्गम भागासह सपाटीच्या गावांचा समावेश असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात ६७ टक्के आदिवासी लोकसंख्या आहे. यातील निम्म्यापेक्षा अधिक जण हे आरोग्यदायी जीवनासाठी शासकीय दवाखान्यांवर अवलंबून आहेत. यात गर्भवती मातांचा समावेश असून या मातांची प्रसूती ही जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात येते. २०२० या वर्षात कोरोनासोबत आरोग्य विभाग दोन हात करत असताना मातामृत्यूच्या घटनाही वाढल्या होत्या. बाळाला जन्म देत असताना मृत्यू पावलेल्या ३४ पैकी १३ मातांची नवजात बालके या जगात सुखरूप आहेत. तर २१ बालकांनी मातांसोबत जगाचा निरोप घेतला होता. प्रसूतीदरम्यान रक्तदाब वाढणे, अंतर्गत रक्तस्त्राव, कमकुवत शरीर यासह विविध वैद्यकीय कारणांमुळे या मातांचा मृत्यू झाला आहे. शासकीय रुग्णालयात झालेल्या मृत्यूसोबतच नंदुरबारातील एका खासगी रुग्णालयातही मातेचा मृत्यू झाल्याची घटना नमूद करण्यात आली आहे.

जिल्ह्यात एप्रिल ते डिसेंबर २०२० या काळात एकूण ३५ मातांचा मृत्यू झाला आहे. यात एप्रिल महिन्यात तीन मातांचा मृत्यू झाला होता. यातील एक मृत्यू घरी, एक धडगाव तर एक नंदुरबार शहरातील खासगी रुग्णालयात झाला होता. या काळात कडक लाॅॅकडाऊन सुरू होते.

मे महिन्यात सहा मातांचा मृत्यू झाला. यातील चार मातांचा मृत्यू जिल्हा रुग्णालय, एका मातेचा रुग्णालयात आणताना रस्त्यात तर एका मातेचा मृत्यू हा अक्कलकुवा येथे झाला.

जून महिन्यात दोन मातांचा मृत्यू झाला. यातील एक माता जिल्हा रुग्णालय तर एक माता धडगाव तालुक्यात तिच्या घरी दगावली.

जुलै महिन्यात चार मातांचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला.

ऑगस्ट महिन्यात सात मातांचा मृत्यू झाला. यातील सहा मातांचा जिल्हा रुग्णालय तर एका मातेचा मृत्यू विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात झाल्याची माहिती समोर आली आहे. ­

सप्टेंबर महिन्यात चार मातांचा मृत्यू झाला होता. हे सर्व मृत्यूही जिल्हा रुग्णालयात झाले होते.

ऑक्टोबर महिन्यात पाच मातांचा मृत्यू झाला. यात दोन जणी या रुग्णवाहिकेतून रुग्णालयात येत असताना वाटेतच त्यांनी जीव सोडला. तर दोघींचा अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यातील त्यांच्या घरीच मृत्यू झाला. एका मातेचा मृत्यू जिल्हा रुग्णालयात झाला.

जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात तीन मातांचा मृत्यू झाला. यातील एका मातेचा प्रवासादरम्यान तर दोघींचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला.

डिसेंबर महिन्यात तीन मातांचा मृत्यू झाला. या तिघी माता जिल्हा रुग्णालयात दाखल होत्या.

२०२० या वर्षातील सर्वाधिक माता मृत्यू हे मे महिन्यात झाल्याचे समोर आले आहे. लाॅकडाऊन काळात हे मृत्यू झाले होते. रक्तदाब आणि इतर कारणांमुळे हे मृत्यू झाल्याने मातांच्या आरोग्यविषयक गांभीर्य वाढले आहे. मृत्यू झालेल्या ९५ टक्के माता ह्या ग्रामीण भागातील आहेत.

तीन मातांचा रस्त्याच झाला मृत्यू

धडगाव येथून सोन प्राथमिक आरोग्य केंद्रात जाताना २६ वर्षीय मातेचा मे २०२० मध्ये, बाहेरील जिल्ह्यातून नंदुरबारकडे येत असताना ३० वर्षीय मातेचा अक्कलकुवा येथून जिल्हा रुग्णालयाकडे येताना मृत्यू झाला होता. या मातांचा मृत्यू हा योग्यवेळी उपचार न मिळाल्याने झाला असावा असा अंदाज आहे. दरम्यान, तीन मातांचा घरीच मृत्यू झाला असल्याचे समोर आलेल्या यादीत दिसून आले आहे. या मातांना वेळीच उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मयत झालेल्या तीनही माता या सातपुड्याच्या दुर्गम भागातील रहिवासी असल्याचे समजते.