शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणासाठी पंतप्रधानांना २० हजार पोस्टकार्ड पाठवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:21 IST

सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाचे आरक्षण रद्द केले. या आरक्षणाच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांनी एक ...

सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाचे आरक्षण रद्द केले. या आरक्षणाच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांनी एक कोटी पोस्टकार्ड पंतप्रधानांना पाठविण्याचा संकल्प केला आहे. त्यांच्या सूचनेवरून तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार उदेसिंग पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा-तळोदा मतदारसंघातून २० हजार पोस्टकार्ड पाठविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याबाबत माहिती देण्यासाठी सोमवारी तळोदा येथे कार्यक्रम आयोजित केला होता. उदेसिंग पाडवी यांनी माहिती देताना सांगितले की, मागील राज्य सरकारच्या चुकीच्या पद्धतीमुळे मराठा समाजाचे आरक्षण न्यायालयाने फेटाळले आहे. मात्र हे आरक्षण पुन्हा मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. यासाठी विशेषत: राष्ट्रवादी युवक काँग्रेसने अधिक कंबर कसली आहे. म्हणूनच पंतप्रधानांना एक कोटी पोस्टकार्ड पाठविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हे कार्ड आम्ही लगेच पोस्टाने रवाना करत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय, संदीप परदेशी, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार सनंसे, डॉ. रामराव आघाडे, भरत चौधरी, योगेश मराठे, कमलेश पाडवी, गणेश पाडवी, आदिल शेख, धर्मराज पवार, मुकेश पाडवी, जयेश जोहरी, कांत्या पाडवी, महेंद्र पोटे, अरविंद वळवी, इमरान सिकलीकर, नदीम बागवान, प्रल्हाद फोके, मोहन मोठे, नवनीत शिंदे, शांताराम गायकवाड, विलास शिंदे, महेंद्र गाडे, ईश्वर पोटे, भास्कर मराठे, अशोक मराठे, संजय बोराणे, अनिल शिंदे आदी उपस्थित होते.