शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारातील २०० भटक्या कुत्र्यांचा मुक्काम जंगलात हलवला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 13:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :   भटक्या कुत्र्यांचे दहशत शहरवासीयांच्या मनातून कमी होत नसल्याचे चित्र आहे. पालिकेकडून सुरू असलेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :   भटक्या कुत्र्यांचे दहशत शहरवासीयांच्या मनातून कमी होत नसल्याचे चित्र आहे. पालिकेकडून सुरू असलेल्या मोहिमेने गती घेणे आवश्यक आहे. अधीक पथकांची नियुक्ती करून या मोहिमेचा उद्देश सफल करावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. आठवडाभरात जवळपास २०० कुत्रे पकडल्याचा दावा ठेकेदाराने केला आहे.       नंदुरबार शहरात भटक्या कुत्र्यांमुळे अनेकांचा जायबंदी व्हावे लागले आहे.  एका बालिकेचा देखील त्यात बळी गेल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. त्यामुळे नागरिकांचा संताप पहाता पालिकेने लागलीच भटके कुत्रे पकडण्याची मोहिम हाती घेतली. परंतु सध्या सुरू असलेली मोहिम नावालाच असल्याचे चित्र आहे. आवश्यक साधनांचा अभाव, प्रशिक्षीत नसलेले कर्मचारी यामुळे आठ दिवसात जवळपास २०० कुत्रे पकडल्याचा दावा करण्यात आला आहे. असे असले तरी भटक्या कुत्र्यांची दहशत अद्यापही शहरात कायम आहे. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊनच वावरावे लागत आहे. रात्रीच्या वेळी तर मोठी दहशत असते.  

एक वाहन आणि १२ कर्मचारींवर मदार... पालिकेकडे कुत्रे पकडण्याची आवश्यक ती साधने उपलब्ध नाहीत. त्यामुळे पारंपारिक पद्धतीने अर्थात दोरीचा फास तयार करून कुत्र्यांचा पाठलाग करून ते पकडले जात आहे. सध्या एक वाहन आणि १२ कर्मचारी त्यासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. 

६० किलोमिटर लांब जंगलात सोडलेशहरातून पकडलेल्या कुत्र्यांना जंगलात सोडले जात आहे. शहरापासून किमान ५० ते ६० किलोमिटर लांब पालिकेचे वाहन जात आहे. जेथे गाव किंवा वस्ती आसपास नाही अशा जंगलाच्या भागात या कुत्र्यांना आतापर्यंत सोडण्यात आल्याचे ठेकेदाराने सांगितले. येत्या काळात पथक वाढविण्यासाठी नियोजन करण्याचा प्रयत्न आहे. 

या प्रमुख भागांत त्रास : मांस विक्री ज्या भागात होते त्या भागात सर्वाधिक त्रास भटक्या कुत्र्यांचा आहे. याशिवाय दाटीवाटीच्या वस्ती, शहरातील मोकळ्या भागातील वस्ती यासह सार्वजनिक चौकांमध्ये भटक्या कु्त्र्यांचा सर्वाधिक त्रास आहे. रात्रीच्या वेळी सर्वाधिक त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे. 

मोकाट कुत्रे पकडण्याची मोहिम पालिकेने सुरू केली आहे. त्यासाठी स्वच्छता ठेकेदाराच्या माध्यमातून पथक तयार करण्यात आले आहे. प्राणी संरक्षण अधिनियमान्वये त्यांचा छळ करणे किंवा ठार मारता येत नाही. त्यामुळे त्यांना पकडून जंगलात सोडावे लागत आहे. -रत्ना रघुवंशी, नगराध्यक्षा, नंदुरबार.

पालिकेने कुत्रे पकडण्याची मोहिम सुरू केली असली तरी त्याला गती येणे आवश्यक आहे. कुत्रे पकडतांना ते एका भागातून दुसऱ्या भागात पळून जातात. त्यामुळे दुसऱ्या वसाहतीमधील नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्याचीही दक्षता घेणे आवश्यक आहे.- जयेश पाटील, नागरिक, नंदुरबार.