शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
2
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
3
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
4
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
5
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
6
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
7
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
8
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
9
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
10
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
11
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
12
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
13
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
14
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
15
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
16
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
17
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
18
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
19
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
20
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटी थकवून १३ कोटीत फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 21:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बोगस कंपनी स्थापन करुन शासनाचा १३ कोटी रुपयांचा जीएसटी थकवल्याप्रकरणी धुळे येथील व्यापाऱ्यासह त्याच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : बोगस कंपनी स्थापन करुन शासनाचा १३ कोटी रुपयांचा जीएसटी थकवल्याप्रकरणी धुळे येथील व्यापाऱ्यासह त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ नवापुर येथे तुमिमा टॅक्स ही कंपनी स्थापन करुन हा प्रकार झाल्याचे उघडकीस आल्यानंतर कारवाई करण्यात आली आहे़मोहंमद आसिफ मोहंमद यासीन रा़ धुळे याच्यासह त्याच्या साथीदारांनी मिळून नवापुर शहरात तुमिमा टॅक्स ही कंपनी स्थापन केली होती़ जुलै २०१७ पासून स्थापन असलेल्या या कंपनीने बनावट कागदपत्रे देऊन जीएसटी क्रमांक प्राप्त केला होता़ परंतू प्रत्यक्ष वस्तूंचा पुरवठा किंवा खरेदी न करताच खोटी बिले सादर करणे सुरु होते़ याबाबत नंदुरबार येथील वस्तू व सेवाकर कार्यालयाचे राज्यकर अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरु होती़ चौकशी अंती कंपनी पूर्णपणे बोगस असल्याचे उघडकीस आले होते़ यात मोहंमद आसिफ याच्यासह व्यापाºयांनी मिळून शासनाचे तब्बल १३ कोटी ६० लाख ८७ हजार ६८९ रुपये बुडवल्याचे स्पष्ट झाले होते़याप्रकारानंतर राज्यकर अधिकारी वसंत वसावे यांनी नवापुर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित मोहंमद आसिफ मोहंमद यासीन याच्यासह व्यापाºयांविरोधात नवापुर पोलीस ठाण्यात फसवणूक केल्याच्या कलमांसह महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवाकर कायदा २०१७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे़तपास पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत हे करत आहेत़ या प्रकाराने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून जीएसटी थकवून शासनाची फसवणूक होण्याचा हा जिल्ह्यातील पहिलाच गुन्हा आहे़ संशयित आरोपींची पोलीसांकडून मंगळवारी तातडीने चौकशी सुरु करण्यात आल्याची माहिती आहे़