शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात 11 वाजेर्पयत 18 टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 12:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील चार मतदार संघात सोमवारी सकाळी सात ते 11 या दरम्यान 18़77 टक्के मतदान ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील चार मतदार संघात सोमवारी सकाळी सात ते 11 या दरम्यान 18़77 टक्के मतदान झाल़े चारही मतदार संघातील 1 हजार 385 मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र सकाळपासून दिसून आल़े  अक्कलकुवा विधानसभा मतदार संघासाठी सकाळी 11 र्पयत 24़2, शहादा 22़75, नवापुर 21़9 तर सर्वाधिक कमी 7़88 टक्के मतदान नंदुरबार विधानसभा मतदारसंघासाठी झाल़े सातपुडय़ाच्या दुर्गम भागातील धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यात मतदानाचा सर्वाधिक उत्साह असून मतदार उत्स्फूर्तपणे मतदान केंद्रांकडे जात असल्याचे चित्र होत़े निवडणुकीत नवापूर मतदारसंघातून 10 उमेदवार नशीब आजमावत आहेत. अक्कलकुवा व नंदुरबार मतदारसंघात प्रत्येकी सहा तर शहादा मतदारसंघात केवळ चार उमेदवार रिंगणात आहेत. सकाळी 7 ते सायंकाळी 6 दरम्यान मतदान होणार आह़े  रविवारी त्या त्या विधानसभा मतदारसंघ मुख्यालयातून निवडणूक कर्मचा:यांना मतदान साहित्य देवून रवाना करण्यात आले होत़े मतदानासाठी 1 हजार 771 ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट उपलब्ध करुन देण्यात आले असून सर्वच ठिकाणी सुरळीतपणे मतदान प्रक्रिया सुरु झाली होती़ विधानसभा निवडणूकीसाठी  भाजपने शहादा, नंदुरबार व नवापूर, काँग्रेसने चारही मतदार संघात, शिवसेनेने अक्कलकुवा, वंचीतने दोन ठिकाणी, बसपा एक तर आप ने एका ठिकाणी उमेदवार दिले आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्ह्यात 1 हजार 100 स्थानिक पोलीस, 855 होमगार्डस्, केंद्रीय तसेच राज्य राखीव दलाच्या चार तुकडय़ा तैनात करण्यात आल्या आहेत. याशिवाय चार संवेदनशील मतदान केंद्र आणि 42  इतर मतदान केंद्रांवर विशेष बंदोबस्त राहणार आहे.दरम्यान नंदुरबार विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार आमदार डॉ़ विजयकुमार गावीत व त्यांच्या पत्नी कुमुदिनी गावीत यांनी नटावद ता़ नंदुरबार, नवापुर मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार भरत गावीत यांनी धनराट ता़ नवापुर, खासदार डॉ़ हीना गावीत यांनी नंदुरबार येथे मतदानाचा हक्क बजावला़