वॉटर कप स्पर्धेतील १७ गावे सत्कारास ठरली पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:31 IST2021-03-31T04:31:15+5:302021-03-31T04:31:15+5:30

सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत गावात जलसंधारणाची कामे करून शिवारातील पाणी शिवारात मुरवून पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी या ...

17 villages qualified for the Water Cup | वॉटर कप स्पर्धेतील १७ गावे सत्कारास ठरली पात्र

वॉटर कप स्पर्धेतील १७ गावे सत्कारास ठरली पात्र

सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत गावात जलसंधारणाची कामे करून शिवारातील पाणी शिवारात मुरवून पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी या अभिनव स्पर्धेत तालुक्यातील २७ गावांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी २२ गावांनी यंदा ऑनलाइन का होईना प्रशिक्षण पूर्ण केले होते. प्रशिक्षणादरम्यान अनेक अडचणी आल्या तरीही संबंधित गावातील ग्रामस्थांनी, जलयोद्धांनी गाव पाणीदार करण्यासाठी आपली जिद्द व चिकाटी कायम ठेवली. त्यातून तालुक्यातील पहिल्या टप्प्यासाठी १७ गावांची निवड करण्यात आली. सत्कारास पात्र असलेल्या गावकऱ्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आमीर खान, किरण राव, जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत ऑनलाइन पद्धतीने गौरवण्यात आले.

समृद्ध गाव मिनी स्पर्धेमध्ये तालुक्यातील सत्कारास पात्र गावे अशी : लोंढरे, पाडळदा बुद्रुक, काथर्दे खुर्द, हिंगणी, कवठळ त.श., कलसाडी, नवानगर, मानमोड्या, कोळपांढरी, वीरपूर, लंगडी भवानी, भुलाणे, दामळदा, गोगापूर, नागझिरी, अंबापूर, फेस आदी गावांचा समावेश आहे.

Web Title: 17 villages qualified for the Water Cup