शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यूवर नियंत्रणासाठी 16 पथक कामाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 12:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : डेंग्यूवर नियंत्रण मिळवता यावे यासाठी प्रयत्नशील असलेल्या प्रशासनाने शहरात 16 आरोग्य पथके पाठवली असून ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : डेंग्यूवर नियंत्रण मिळवता यावे यासाठी प्रयत्नशील असलेल्या प्रशासनाने शहरात 16 आरोग्य पथके पाठवली असून त्यांच्याकडून सव्रेक्षण करुन रक्तनमुने संकलन केले जात आह़े दरम्यान शहरात सात मशीनद्वारे धूर फवारणी करण्यात आली आह़े डेंग्यूमुळे दोन आठवडय़ापासून शहरात हाहाकार उडाला होता़ सर्वच दवाखान्यांमध्ये डेंग्यूचे रुग्ण आढळून येत असल्याने भिती वाढली होती़ डेंग्यूवर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य यंत्रणा जोरदारपणे कामाला लागली होती़ साथ वाढण्याची भिती असल्याने आरोग्य पथकांनी घरोघरी जावून पाणी परीक्षण करत नागरिकांना कोरडा दिवस पाळण्यासह विविध उपाययोजनांची माहिती दिली होती़ यातून शहरात तूर्तास डेंग्यूसदृश तापाचे रुग्ण आढळून आलेले नसल्याची माहिती देण्यात आली आह़े डेंग्यू नियंत्रणात रहावा यासाठी शहरात आरोग्य विभागाची 16 पथके कार्यरत आहेत़ दरम्यान सोमवारपासून एलायझा किट संपल्याने संशयित रुग्णांचे रक्त नमुने तपासणी थांबली होती़ गुरुवारी जिल्हा रुग्णालयात कीट प्राप्त झाल्यानंतर शुक्रवारपासून तपासण्या सुरु करण्यात आल्या़ नवीन कीटद्वारे 200 जणांच्या तपासण्या पूर्ण होणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े आरोग्य विभागाला लवकरच वाढीव कीट पाठवण्यात येणार आह़े 

शहरात डेंग्यूचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी पालिकेने केलेल्या चार भागांमध्ये पथकांकडून कारवाई करण्यात येत आह़े शुक्रवारी सकाळपासून म्हाडा कॉलनी, हुडको कॉलनी यासह विविध ठिकाणी सव्रेक्षण करण्यात आले होत़े या सव्रेक्षणादरम्यान नागरिकांनी घरातील पाण्याचे साठे व भरलेल्या टाक्या खाली करुन दिल्या होत्या़ शहरात आरोग्य विभागाने पाच तर पालिकेने 1 लहान आणि 1 जंबो फॉगिंग मशीनद्वारे फवारणी सुरु केल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आह़े आरोग्य विभागाकडे अद्यापही 90 जणांचे रक्तनमुने तपासणीसाठी देण्यात आले आहेत़