शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
2
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
3
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
4
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
5
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
6
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
7
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
8
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
9
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
10
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
11
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
12
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
13
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
14
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
15
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
16
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
17
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
18
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
19
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
20
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
Daily Top 2Weekly Top 5

धनपूर धरणाच्या पाटचारीसाठी दीड कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 12:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बोरद : सहा वर्षापूर्वी काम पूर्ण होऊनही धनपूर ता. तळोदा येथील धरणातून पाटचारीअभावी सिंचनासाठी पाणी पुरवठा ...

लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : सहा वर्षापूर्वी काम पूर्ण होऊनही धनपूर ता. तळोदा येथील धरणातून पाटचारीअभावी सिंचनासाठी पाणी पुरवठा करण्यात येत नव्हते. परंतु या प्रलंबित कामासाठी राज्य शासनामार्फत दीड कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे मोड, बोरद व खेडले यासह अन्य गावांमधील तब्बल २७२ हेक्टर शेतजमिनीला पाणी पुरवठा होणार आहे. त्यातून शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न मिळविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.तळोदा तालुका शेती समृद्ध असला तरी तालुक्यातील काही भागात उन्हाळी कालावधीत पाण्याची टंचाई निर्माण होत होती. यावर मात करण्यासाठी काही वर्षांपूर्वी तालुक्यातील नागरिकांमार्फत आंदोलने करण्यात आली. आंदोलनाची फारशी दखल घेतली जात नसल्याने तालुक्यात पुन्हा कॉ. जयसिंग माळी यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष समिती तयार करण्यात आली. या समितीमार्फत आमलाड येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते, त्याची दखल घेत धनपूर येथे धरण बांधण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्यामुळे या धरणाचे उद्घाटन २००८ मध्ये माजी उपसभापती दीपक मोरे यांच्या हस्ते करण्यात आले, त्याचे काम २०१४ मध्ये पूर्ण झाले. परंतु परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी पुरवठा करण्यास आवश्यक असलेल्या पाचचारीचे काम झाले नव्हते. त्यामुळे काम पूर्ण होऊन सहा वर्षाचा कालावधी उलटूनही शेतकºयांना पाणी वाटप करण्यात आले नव्हते. त्यामळे मुबलक जलसाठा असूनही शेतशिवार कोरडे होते. उर्वरित कामांसाठी राज्य शासनामार्फत नुकतेच दीड कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.या मंजूर निधीतून सर्व कामे पूर्ण होण्याची अपेक्षा शेतकºयांकडून व्यक्त करण्यात येत आहे. वर्षानुवर्षे विकासापासून वंचित राहिलेल्या या भागाच्या विकासाला चालना मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.धरण परिसरातील ७० टक्के आदिवासी शेतकºयांचा जमिनी सिंचनाखाली येणार आहे. त्यामुळे त्यांची शेती बागायती होऊन विविध पिके घेता येतील. आर्थिकदृष्ट्य त्यांना प्रगती करता येणार आहे. शिवाय परिसरातून रोजगारासाठी होणारे स्थलांतरांवर काही प्रमाणात नियंत्रण देखील आणता येणार आहे. निधी मिळविण्यासाठी पालकमंत्री तथा आदिवासी विकाम मंत्री अ‍ॅड. के.सी.पाडवी यांचे योगदान लाभले.धनपूर धरण सातपुडा पर्वतातून उगम पावणाºया निझरा या नदीवर बांधण्यात आले आहे. धनपूर धरण साकारावे म्हणून १९९६ पासून आजतागायत, मोर्चे, उपोषण, निवेदन, घेराव, रस्ता रोको आदी मार्गांनी आंदोलने केली. त्यानंतर सुमारे २५ वर्षानंतर शेतकºयांचे स्वप्नांना आकार मिळाला. धरणात मुबलक जलसाठा असूनही बांधापर्यंत पाणी पोहोचत नव्हते. पाटचाºयांचे बांधकाम करणे आवश्यक आहे.