शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

नवापूर तालुक्यात अवैध मद्य जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 11:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : औरंगाबाद येथून कडोदरा सुरतकडे विना परवाना विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या वाहनासह पावणेपाच लाख रुपयांचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : औरंगाबाद येथून कडोदरा सुरतकडे विना परवाना विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या वाहनासह पावणेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल एलसीबीच्याकर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतला़ पथकाकडून संशयित वाहन चालकासही अटक करण्यात आली आहे़औरंगाबाद ते कडोदरा असा प्रवास करणाºया जी़जे ५ सी़एल ५५२६ हे वाहन राष्ट्रीय महामार्गावरुन नवापुर येथून करंजी मार्गे झामणझर रस्त्याकडे वळाली. सोनगढकडे जाणारा हा रस्ता आहे. दरम्यान अवैध एलसीबीचे कर्मचारी महेंद्र नगराळे, जितेंद्र तोरवणे व शांतीलाल पाटील यांना गुप्त बातमीद्वारे या मार्गाने अवैध मद्य तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली होती़ यांच्या लक्षात हा प्रकार आल्याने त्यांनी खाजगी वाहनाने त्या कारचा पाठलाग केला. झामणझर गावाजवळ वाहनास अडवून विचारपुस केली असता चालकाने प्रारंभी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने संशय बळावला. वाहनाची तपासणी केली असता त्यात दोन पोत्यांमध्ये ७३ हजार ७२० रुपयांच्या विदेशी मद्याच्या बाटल्या आढळून आल्या़ ७३ हजाराच्या मद्यासह पथकाने चार लाख रुपयांचे वाहनही जप्त केले आहे़याप्रकरणी चालक मोहसिन ऊर्फ मुन्ना अब्दुल कादर मावद रा. सुरत याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे.जिल्हा पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरिक्षक किशोर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली महेंद्र नगराळे, जितेंद्र तोरवणे व शांतिलाल पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.