चिंचपाडा वनक्षेत्रात १२० झाडांची कत्तल, एकाविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:29 IST2021-03-20T04:29:24+5:302021-03-20T04:29:24+5:30

मिळालेल्या माहितीनुसार, चिंचपाडा रेंज कर्मचारी गस्त करीत असताना पिंपळा मधील कंपार्टमेंट नंबर ११३ मध्ये रमेश जोद्या गावित हा ...

120 trees felled in Chinchpada forest area, case filed against one | चिंचपाडा वनक्षेत्रात १२० झाडांची कत्तल, एकाविरुद्ध गुन्हा दाखल

चिंचपाडा वनक्षेत्रात १२० झाडांची कत्तल, एकाविरुद्ध गुन्हा दाखल

मिळालेल्या माहितीनुसार, चिंचपाडा रेंज कर्मचारी गस्त करीत असताना पिंपळा मधील कंपार्टमेंट नंबर ११३ मध्ये रमेश जोद्या गावित हा एक-दोन दिवसापासून अतिक्रमण करण्याच्या उद्देशाने १२० झाडांची तोड करून, जागा साफसफाई करून, बुडे जाळपोळ करीत होता. त्याला रंगेहात पकडून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला नंदुरबार न्यायालयात उभे केले असता त्याला २२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. ही कारवाई सहाय्यक वनसंरक्षक धनंजय पवार, वनक्षेत्रपाल आर बी.पवार, वनपाल नितीन मंडलिक, युवराज भाबड, वनरक्षक ईश्वर चौधरी, रामदास पावरा, दीपा कापडणीस, आशुतोष पावरा, तुषार नांद्रे, देवमन सूर्यवंशी, प्रवीण खैरनार, मनीषा जाधव, भानुदास वाघ, अरविंद निकम, चामारिया गावित, रविदास गावित, वाहन चालक साहेबराव तुंगार आदींनी केली.

Web Title: 120 trees felled in Chinchpada forest area, case filed against one