शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

दीड लाखाच्या गोवंशसह ११ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:21 IST

पोलीस सूत्रांनुसार, नंदुरबार येथील उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांना नंदुरबार येथील गोसेवक डॉ.नरेंद्र पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी माहिती ...

पोलीस सूत्रांनुसार, नंदुरबार येथील उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांना नंदुरबार येथील गोसेवक डॉ.नरेंद्र पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी माहिती दिली की, नंदुरबारहून विसरवाडीमार्गे मालेगाव येथील आयशानगर येथे कत्तलीसाठी गोवंश भरलेली मालट्रक जाणार आहे. याबाबत त्यांनी त्वरित विसरवाडी पोलिसांना माहिती दिली, यावरून विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील, हवालदार सुरेश मोरे, अनिल राठोड, भोजराज धनगर, विश्वनाथ नाईक, वाहन चालक राजू कोकणी यांच्या पथकाने पोलीस ठाण्याजवळ बेरॅकेट लावून नाकाबंदी केली.

यावेळी वाहनांची तपासणी करीत असताना, एक ट्रक(क्र.एम.एच.४८जे.१२६४)भरधाव वेगाने येताना दिसला. तो ट्रक अडवून चालकास विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. यावेळी विसरवाडी पोलिसांनी ट्रकची तपासणी केली असता, त्यामध्ये अत्यंत निर्दयपणे नऊ गाई, सहा बैले, सहा वासरे असे एकूण २१ गोवंश पाय तोंड बांधून कोंबण्यात आलेली होती.

या प्रकरणी विसरवाडी पोलिसांनी ट्रक चालक शेख मोबीन शेख उस्मान, सहचालक रिजवान खान इब्राहिम खान, हमाल साजिद अहमद रियाज अहमद, मालक मोहम्मद मुस्ताक इन मोहम्मद रफीक सर्व रा.मालेगाव या चार जणांना अटक केली असून, ट्रकमधील एक लाख ६० हजार रुपये किमतीचे गोवंश व दहा लाख रुपये किमतीचा ट्रक असे ११ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.

दरम्यान, निर्दयपणे गोवंश कोंबून भरधाव वेगाने धावणाऱ्या ट्रकचा नंदुरबार येथील गोसेवक डॉ.नरेंद्र पाटील, भूषण पाटील, विशाल जयस्वाल व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाठलाग केला असता, ट्रकमधील संशयितांनी त्यांच्यावर मिरचीची पूड फेकली. मात्र, त्यांनी ट्रकचा पाठलाग सोडला नाही. या दरम्यान, ते सातत्याने पोलिसांच्या संपर्कात होते. आपल्या जीवाची पर्वा न करता, या गोसेवकांनी आपले कर्तव्य पार पाडले.

२१ जनावरांना नंदुरबार येथील चौपाळा गोसेवा केंद्रात पाठविण्यात आले आहे. विसरवाडी पोलीस ठाण्यात संशयितांविरुद्ध प्राणी संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.