शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

नवापूर तालुक्यात सांगाळी येथे १०० टक्के लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:30 IST

खांडबारा : नवापूर तालुक्यातील सागाळी येथील कोविड प्रतिबंधक लसीकरणात ३३१ नागरिकांचे पूर्ण लसीकरण होऊन १०० टक्के लसीकरण झाले. लसीकरणात ...

खांडबारा : नवापूर तालुक्यातील सागाळी येथील कोविड प्रतिबंधक लसीकरणात ३३१ नागरिकांचे पूर्ण लसीकरण होऊन १०० टक्के लसीकरण झाले. लसीकरणात सागाळी हे गाव नवापूर तालुक्यातील प्रथम गाव ठरले आहे.

सागाळी जिल्हा परिषद शाळेत १४ मे रोजी घेण्यात आलेल्या शिबिरात प्रथम १३३ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले होते. त्यानंतर उर्वरित ४५ वर्षे व त्यावरील १९८ नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी पंचायत समिती सदस्य छगन महाले, सरपंच संजय कोकणी, उपसरपंच संगीता कोकणी, ग्रामसेवक दौलत कोकणी, केंद्रप्रमुख सुनीता अमृतसागर, शिक्षक दिनेश पाडवी, सोनल नेरकर ,आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांनी जनजागृती करून त्या सर्वांना नजीकच्या नवापाडा, निंबोणी व नगारे येथील लसीकरण शिबिरात घेऊन जाऊन लसीकरण करून १०० टक्के नागरिकांचे लसीकरण करून घेतले असून, तालुक्यात सागाळी या ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावला आहे.

यासाठी तालुका ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष दौलत कोकणी यांनी आदर्श निर्माण करून तालुक्यातील सर्व गावे १०० टक्के लसीकरण करण्यासाठी सर्व ग्रामसेवकांना सहकार्य करणार असल्याची माहिती ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

या ग्रामपंचायतीचे सरपंच संजय कोकणी, ग्रामसेवक दौलत कोकणी, उपसरपंच संगीता कोकणी, पंचायत समिती सदस्य छगन महाले यांचे तहसीलदार मंदार कुलकर्णी, गटविकास अधिकारी चंद्रकांत माळी यांनी कौतुक केले. तालुक्यातील इतर गावांनी ही कामगिरीसाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.