शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार जिल्ह्यात रविवारी आढळले १० रुण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 21:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील कोरोनाबाधीतांचा आकडा आता द्विशतकाच्या घरात आला आहे. एकुण संख्या १९० पर्यंत पोहचली आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील कोरोनाबाधीतांचा आकडा आता द्विशतकाच्या घरात आला आहे. एकुण संख्या १९० पर्यंत पोहचली आहे. याशिवाय मृतांचा आकडा देखील एकने वाढला आहे. तोरखेडा येथील मयत वृद्धाचा अहवालही पॉझिटिव्ह आल्याने एकुण संख्या नऊ झाली आहे. दरम्यान, अजूनही १२४ स्वॅब अहवालांची प्रतीक्षा आहे.जिल्ह्यातील कोरोनाबाधीतांची संख्या वाढत आहे. आकडा १९० पर्यंत पोहचला आहे. रविवारी १० जण आढळून आले आहेत. त्यात एकट्या तोरखेडा गावातील एकाच कुटूंबातील सहा जणांचा समावेश आहे. त्यातील एका जणाचा तीन दिवसांपूर्वीच मृत्यू झाला आहे. तर पाच जणांना यापूर्वीच क्वॉरंटाईन करण्यात आले होते.७८ वर्षीय वृद्धाला त्रास सुरू झाल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार घेतांना त्यांचा मृत्यू झाला. तोपर्यंत त्यांच्या स्वॅबचा अहवाल आलेला नव्हता. तरीही संशयीत म्हणून त्यांच्यावर कोविडच्या नियमावलीनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या वृद्धाचाही स्वॅब पॉझिटिव्ह आल्याने आता जिल्ह्यातील मृृतांची संख्या एकुण नऊ झाली आहे.याशिवाय नंदुरबार शहरातील जिजाऊनगरातील दोन जणांचा देखील कोरोनाग्रस्तांमध्ये समावेश आहे. एकजण जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी असून एकजण तळोदा येथील रुग्ण आहे.तोरखेडा येथे आधीपासूनच सर्व ती दक्षता घेतली जात आहे. गावात प्रतिबंध क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे. संबधीत कुटूंबातील सदस्य आणि त्यांच्या संपर्कातील लोकांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.याशिवाय नंदुरबारातील जिजाऊ नगरातील दोनजण आढळल्याने या भागात देखील प्रतिबंधीत क्षेत्र करून उपाययोजना करण्यात आल्या आहेत.