नंदुरबार जिल्ह्यात १० जण कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 18:02 IST2020-06-18T18:02:23+5:302020-06-18T18:02:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील १० जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे़ गुरुवारी धुळे वैद्यकीय महाविद्यालयातून प्राप्त झालेल्या अहवालानुसार ...

10 corona positive in Nandurbar district | नंदुरबार जिल्ह्यात १० जण कोरोना पॉझिटिव्ह

नंदुरबार जिल्ह्यात १० जण कोरोना पॉझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील १० जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे़ गुरुवारी धुळे वैद्यकीय महाविद्यालयातून प्राप्त झालेल्या अहवालानुसार हे १० जण पॉझिटिव्ह असल्याची माहिती देण्यात आली आहे़
स्वॅब रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेल्यात तळोदा येथील सात, नंदुरबार २ तर शहादा येथील एकाचा समावेश आहे़ तळोदा शहरातील मोठा माळीवाडा भागातील ५४ वर्षीय पुरुष, २२, ४५, २६ आणि ३९ वर्षीय महिला, काकाशेट गल्लीतील ३५ तर शिवरा नगरातील ५१ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे़
नंदुरबार शहरातील सिंधी कॉलनीतील ६३ वर्षीय पुरुष आणि मणियार मोहल्ला भागातील ४६ वर्षीय महिलेस तसेच लोणखेडा ता़ शहादा ६४ वर्षीय महिलेस कोरोनाचा संसर्ग झाला आहे़
एकाच दिवसात १० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ७८ झाली आहे़ आतापर्यंत कोरोनामुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे़ तळोदा शहरात वृद्धेचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या कुटूंबातील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता़ त्यानंतर थेट सात जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे़ दरम्यान आरोग्य विभागाचे पथक तळोदा, लोणखेडा ता़ शहादा आणि नंदुरबार येथे बाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेत त्यांना क्वारंटाईन करण्याचे कामकाज करत आहे़

Web Title: 10 corona positive in Nandurbar district