शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
3
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
4
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
5
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
6
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
7
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
8
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
9
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
10
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
11
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
12
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
13
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
14
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
15
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
16
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
17
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
18
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
19
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

मालेगाव परिसराला हक्काचे पाणी मिळणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2018 11:56 PM

या भागाला उर्ध्व पैनगंगा (इसापूर) धरणाचे हक्काचे पाणी मिळणे अपेक्षित असताना सिंचन विभाग मात्र पाणी देण्यास टाळाटाळ करीत आहे़

ठळक मुद्दे१२ हजार हेक्टर लाभक्षेत्रावर संक्रांतसिंचन विभागाचे कानावर हात

मालेगाव : यावर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने पूर्णा प्रकल्पांतर्गत येणाऱ्या येलदरी व सिद्धेश्वर धरणात पाणीसाठा उपलब्ध नसल्याने मालेगाव परिसरातील बारा हजार हेक्टर शेतीपिकांच्या लाभक्षेत्रावर मोठे संकट निर्माण झाले असून या भागाला उर्ध्व पैनगंगा (इसापूर) धरणाचे हक्काचे पाणी मिळणे अपेक्षित असताना सिंचन विभाग मात्र पाणी देण्यास टाळाटाळ करीत आहे़ सदरील पाणी न मिळाल्यास शेतकरी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत़खा़ अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री असताना २००९ साली इसापूर धरणाच्या उजव्या कालव्यातून भाटेगाव शाखेतून दाभडी (जि़हिंगोली) वितरिकेतून पूर्णा प्रकल्पक्षेत्रात पाणीटंचाई परिस्थिती निर्माण झाली तर उर्ध्व पैनगंगा येथून पाणी सोडण्यासाठी २८ एप्रिल २००९ रोजी मंत्रालयात झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता दिली होती़त्यामध्ये उर्ध्व पैनगंगा धरण ७५ ते १०० टक्के भरलेले असल्यास या भागाला २० दलघमी तर ५० टक्के उपलब्ध पाणीसाठा असेल तर १० दलघमी पाणी देण्यास मंजुरी मिळाली होती़ सद्य:स्थितीत उर्ध्व पैनगंगा (इसापूर) धरणात ६५ टक्के पाणी साठा उपलब्ध असून शासन निर्णयाप्रमाणे पूर्णा प्रकल्पांतर्गत येणाºया मालेगाव परिसरातील ऊस, हळद, कापूस या पिकांना १० दलघमी पाणी देणे बंधनकारक आहे़ सद्य:स्थितीत पूर्णा प्रकल्पांतर्गत येणाºया सिद्धेश्वर, येलदरी धरणात मृतसाठा असल्याने मालेगाव परिसरातील पिकांना पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे़ सद्य:स्थितीत मालेगाव परिसरातील ऊस, कापूस, हळद व रबी पिकांचे एकूण लाभक्षेत्र १२ हजार हेक्टरच्या वर आहे़ उर्ध्व पैनगंगेचे पाणी मालेगाव परिसरातील शेतीला देण्यासंदर्भात ३ नोव्हेंबर रोजी खा़ अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत सिंचन विभागाची बैठक घेण्यात आली़ या बैठकीत पूर्णा प्रकल्पांतर्गत येणाºया सिंचन विभागातील अधिकाºयांना पाणी देण्याबाबत खा़ चव्हाण यांनी सूचना केल्या़ या बैठकीला भाऊराव चव्हाण साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव तिडके, संचालक रंगराव कदम, काँग्रेस तालुकाध्यक्ष केशवराव इंगोले, माजी जि़ प़ अध्यक्ष माणिकराव इंगोले, बळवंत पाटील यांची उपस्थिती होती़उर्ध्व पैनगंगेच्या भाटेगाव शाखा कालव्यातून दाभडी (जि़हिंगोली) नाल्याद्वारे पूर्णा प्रकल्पांतर्गत येणाºया मालेगाव, बामणी, देळूब बु़, कामठा बु़, डौर, धामधरी, कोंढा, देळूब खु़, शेलगाव बु़, पिंपळगाव म़, उमरी, सावरगाव, देगाव कु़, सांगवी खु़, गणपूर, मेंढला खु़, शहापूर आदींना गावातील शेती लाभक्षेत्राला व पिण्याच्या पाण्यासाठी लाभ मिळतो़ हक्काचे पाणी न मिळाल्यास मालेगाव परिसरातील १२ हजार हेक्टर पिके वाया जाणार आहेत़दाभडी नाल्याचा प्रश्न अधांतरीउर्ध्व पैनगंगेचे पाणी पूर्णा प्रकल्प क्षेत्रास भाटेगाव कालव्यातून हिंगोली जिल्ह्यातील दाभडी नाल्यातून मिळते़ पाणीपातळी वेळी या भागातील शेतकरी संपादित जमिनीचा मावेजा न मिळाल्यामुळे पाणी देण्यास अनेक वर्षांपासून विरोध करतात़ दाभडी नाल्याच्या दुरुस्तीसाठी शासनाचा निधी उपलब्ध असूनही हे काम मात्र रेंगाळलेले आहे़

मालेगाव परिसरात एकूण बारा हजार हेक्टर लाभक्षेत्र असून सध्या ऊस, हळद यासारखी पिके पाण्याअभावी वाळून जात आहेत़ उर्ध्व पैनगंगेचे पाणी १० दलघमी रोटेशन ४:३:३ असे विभागून देण्यात यावे -केशवराव इंगोले, तालुकाध्यक्ष, काँग्रेस, अर्धापूऱ

इसापूरचे पाणी हे शेतकºयांच्या हक्काचे पाणी आहे़ पाणी उपलब्ध असूनही सिंचन विभाग मात्र पाणी देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत आहे़ पाणी न मिळाल्यास शेतकरी रस्त्यावर उतरणार आहे -रंगराव इंगोले, संचालक, भाऊराव चव्हाण सक़ारखाना़

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीwater scarcityपाणी टंचाईFarmerशेतकरी