शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
2
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
3
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
4
'धनुष्य बाण' कुणाचा, उद्धवसेना की शिंदेसेना? १६ जुलैला 'सुप्रीम' सुनावणी
5
अवघी दिल्ली एवढी लोकसंख्या, तरीही भारताच्या दृष्टीने 'घाना' देश महत्त्वाचा! कारण तरी काय?
6
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीची चमकही झाली कमी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवी किंमत
7
पवार काका-पुतण्यांना दे धक्का; NCP च्या दोन्ही गटातील दिग्गज नेत्यांचा भाजपामध्ये प्रवेश
8
Apoorva Mukhija : "मी सिंगल आहे, मला आता लग्न करायचंय; बॉयफ्रेंड शोधतेय, प्लीज कोणीतरी..."
9
Viral Video : हत्तीचं पिल्लू इवल्याशा बेडकाला घाबरलं; क्यूटनेस व्हिडीओनं नेटकऱ्यांचं मन जिंकलं!
10
जे कुणाला जमलं नाही ते टीम इंडियानं करून दाखवलं; इंग्लंडच्या मैदानात रचला इतिहास
11
कशापाई तू वारी हट्ट केलास रे बाळा.. आता मी घरी एकटीच जाऊ का; गोविंदासाठी आजीने फोडला हंबरडा
12
Chanakyaniti: चाणक्यनीतीनुसार तरुणपणी केलेल्या 'या' तीन चुका म्हातारपणी भोवतात!
13
IND W vs ENG: स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा टी२० क्रिकेटमधील सुपरहिट जोडी, रचला नवा इतिहास!
14
'एक दिवसाचा पंतप्रधान'! आशिया खंडातील देशात उद्भवला बाका प्रसंग, 'नायक' सिनेमा आठवेल...
15
नाशिकमध्ये पतीविरोधात बलात्काराचा गुन्हा, पत्नीने बाळाला जन्म दिल्यानंतर समोर आले प्रकरण
16
"पप्पा, मला पावसात खेळायचंय"; १० वर्षांच्या लेकाचा हट्ट अन् हैवान झाला बाप, घेतला जीव
17
"सर्वाधिक पोलीसमृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने"; विरोधी पक्षनेते दानवेंनी मांडली आकडेवारी
18
'मीच मुख्यमंत्री राहणार', सिद्धारमय्या यांची स्पष्टोक्ती; डीके शिवकुमार म्हणाले...
19
स्वप्नांना पंख मिळाले! कठोर परिश्रमाने घातली आकाशाला गवसणी; आता नौदलात होणार अधिकारी
20
भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा राहतात प्रसिद्धीपासून दूर, ते सध्या आहेत कुठे? करतात काय? जाणून घ्या

माहुरात दहा दिवसांआड पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 00:28 IST

शहराला लागून गेलेल्या पैनगंगा नदीपात्रातील कोल्हापुरी बंधाऱ्यात भरपूर पाणी असूनही पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शहरवासीयांसह भाविकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्देशहरातील नागरिकांसह भाविक त्रस्त पाणीपुरवठ्यासंदर्भात उपाययोजना करण्याची मागणी

श्रीक्षेत्र माहूर : शहराला लागून गेलेल्या पैनगंगा नदीपात्रातील कोल्हापुरी बंधाऱ्यात भरपूर पाणी असूनही पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शहरवासीयांसह भाविकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. शहरात नळाद्वारे दहा दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत़शहरात सहा महिन्यांपूर्वी रुजू झालेल्या मुख्याधिकारी विद्या कदम यांनी पाणीटंचाई जाणवू नये म्हणून प्रयत्न करत नदीत पाणी नसेपर्यंत मेरुवाळा तलावातून आठ ते दहा दिवसांआड पाणी पुरविले़ नदीत पाणी येताच मोटार जळणे पाईपलाईन फुटणे, तसेच पाणी पुरत नसल्याचे कारण दाखवून ९४ पैकी फक्त मजीर्तील ४ वॉल्व्हला दिवसभरात पाणी सोडणे इत्यादी प्रकार सुरू झाला. काही काही वॉर्डात पाणी न सोडण्याच्या प्रकारामुळे नगरसेवकही त्रस्त झाले आहेत.शहरात निर्जळी असल्याने नागरिक नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांच्याकडे गेले असता त्यांनी आचारसंहिता असल्याचे कारण सांगितले़ निवडणूक लागल्याने सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते प्रचारात व्यस्त असून त्यांच्या घरी टँकरने पाणी आणावे लागत आहे़ दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याबद्दल कोणीच शब्द काढायला तयार नाही़ तर दुसरीकडे माहूर येथील नागरिक तलाव, कुंड, स्वच्छ करण्यासाठी, पाणीपातळी वाढावी म्हणून श्रमदानातून गाळ काढत असून असलेले पाणी शहरात वाटपात नगरपंचायत अकार्यक्षम ठरत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे़ शहरातील पाणीप्रश्न निकाली काढण्यासाठी प्रशासनाने योग्य पाऊल उचलणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे़श्रमदानातून काढला गाळ,पवित्र जागमाता कुंडही होणार स्वच्छशहरवासियांनी साखळी तयार करून जागमाता कुंडाशेजारी मातृतीर्थ रस्त्यावरील काशीतीर्थ कुंड स्वच्छ व गाळ काढण्यासाठी श्रमदान सुरू केल्याने तलाव, कुंड, झरे पाण्याने खळाळत वाहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे़ अंबादास श्रीकृष्ण जोशी, वेदाध्ययन ज्ञानपीठ येथील प्रधानाचार्य निलेश वसंत केदार गुरुजी, श्री परशुराम स्थापित संकटमोचन गणपती मंदिर (श्री दत्तयोग आश्रम माहूरगढ) चे महंत कपिले गुरुजी, समाजसेविका प्रणिता जोशी, यांनी विद्यार्थी व मित्र परिवारास सोबत घेत २९ रोजी काशीतीर्थ कुंड स्वच्छतेस सुरुवात केली़ शहरात पहिल्यांदाच पाणी पुरवठ्याच्या पौराणिक स्त्रोतांचे पुनुरुज्जीवन श्रमदानातून होत असल्याची माहिती मिळताच तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी येथे भेट देवून जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनय गोयल यांना ही माहिती दिली. एकलारे बंधूंनी जेसीबी तत्काळ उपलब्ध करून दिला आहे़

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई