शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

खत प्रकल्पाची वाट बिकट

By admin | Updated: September 2, 2014 01:49 IST

नांदेड : शहरातील घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी तुप्पा येथे उभारण्यात आलेला महत्वाकांक्षी खत प्रकल्प बंद झाल्याने हा प्रकल्प उभारणीची वाट आता बिकट झाली आहे़

नांदेड : शहरातील घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी तुप्पा येथे उभारण्यात आलेला महत्वाकांक्षी खत प्रकल्प बंद झाल्याने हा प्रकल्प उभारणीची वाट आता बिकट झाली आहे़ मागील दोन वर्षांपासून तुप्पा खत प्रकल्पाचे काम विविध कारणामुळे रखडले़ यासाठी एटूझेड कंपनीला अनेकवेळा मुदतवाढ दिली होती़ परंतु एटूझेड कंपनीने मुदतवाढीला केराची टोपली दाखवित हे काम औरंगाबाद येथील उपकंत्राटदाराकडे सपूर्द केले़ मे २०१३ मध्ये हा प्रकल्प सुरू करण्यासाठी मनपा प्रशासनाने प्रयत्न केले़ शहरातील संकलित केलेला घनकचरा तुप्पा येथील प्रकल्पाच्या ठिकाणी टाकण्यातही आला़ मात्र प्रकल्पाचे काम पूर्णत्वास गेले नाही़ तुप्पा येथील खत प्रकल्पाचे काम करणाऱ्या एटूझेड कंपनीचे काम रद्द केले आहे़ त्यामुळे हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे़ या प्रकियेनंतर खत प्रकल्पाच्या उर्वरित कामासाठी नव्याने निविदा मागविण्यात येतील़ मराठवाड्यातील पहिलाच खत प्रकल्प नांदेड येथे उभारण्यात येत असला तरी या प्रकल्पाच्या कामाला सुरूवातीपासून अनेक अडथळ्यांची शर्यत पूर्ण करावी लागली़ २० कोटी रूपयांचा हा प्रकल्प हरियाणा राज्यातील एटूझेड कंपनीकडून चालविण्यास दिला़ त्यानंतर काही दिवसांतच या प्रकल्पाचे काम रखडले़ मार्च २०१२ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मुदत देण्यात आली होती़ त्यानंतर मार्च २०१३ पर्यंत हा प्रकल्प सुरू करण्यास पाचव्यांदा मुदतवाढ देण्यात आली होती़ एटूझेड कंपनीने औरंगाबाद येथील मायोव या सहयोगी कंपनीसोबत करार करून हा प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न चालविला होता़ परंतु त्यांचा हा प्रयत्न अर्ध्यावरच थांबला़ त्यामुळे प्रशासनाने या प्रकल्पाचे काम बंद झाल्याचे स्पष्ट करीत संबंधित कंत्राटदाराकडून हे काम काढण्यात आले़ (प्रतिनिधी)शहरातील घनकचऱ्यावर प्रक्रिया करून विल्हेवाट लावण्यासाठी अत्याधुनिकरित्या शास्त्रोक्त पद्धतीने खतनिर्मितीचा प्रकल्प २०११ मध्ये हाती घेण्यात आला होता़ प्रकल्पाची जागा २४ एप्रिल २०१२ मध्ये कंत्राटदारास दिल्यानंतर १२ महिन्यांच्या आत प्रकल्प पूर्ण करणे बंधनकारक होते़ परंतु सदर प्रकल्प पूर्ण होवू शकला नाही़