बहीण-भावावर शाैचालयाची भिंत कोसळली; भावाचा मृत्यृू, बहीण गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:54 IST2021-01-08T04:54:49+5:302021-01-08T04:54:49+5:30

येथील प्रभाग क्रमांक पाचमधील नवीन वस्तीत सुरेश सिदमुलवाड यांचे घर असून त्यांच्या घरा पाठीमागे त्यांची लक्ष्मी आणि गायत्री ही ...

The wall of the toilet collapsed on the siblings; Brother killed, sister seriously injured | बहीण-भावावर शाैचालयाची भिंत कोसळली; भावाचा मृत्यृू, बहीण गंभीर जखमी

बहीण-भावावर शाैचालयाची भिंत कोसळली; भावाचा मृत्यृू, बहीण गंभीर जखमी

येथील प्रभाग क्रमांक पाचमधील नवीन वस्तीत सुरेश सिदमुलवाड यांचे घर असून त्यांच्या घरा पाठीमागे त्यांची लक्ष्मी आणि गायत्री ही मुले शौचालयाच्या बाजूला खेळत होती. दोघेही खेळण्यात दंग असताना या बहीण-भावावर शेजारील घरमालकाच्या शौचालयाची एका बाजूची भिंत अचानक कोसळली. ज्यात लक्ष्मण सुरेश सिदमुलवाड या बालकाच्या चेह-यावर, डोक्यावर भिंत कोसळल्याने त्याचा दुर्दैवी अंत झाला. तर गायत्री या आठ वर्षीय बालिकेच्या पोट आणि पायावर ही भित पडल्याने ती ही गंभीर जखमी झाली. तिच्यावर विष्णुपुरी नांदेड येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन्ही भावंडे कोसळलेल्या विटांच्या ढिगाऱ्याखाली अडकले होते. शेजा-यांनी बाहेर काढले. अत्यंत गरीब कुटुंबातील या भावंडांवर कोसळलेली भिंत मनाला वेदना देणारी आहे. या घटनेनंतर महिलांच्या आक्रोशाने येथील नागरिकांनी या भावंडांना बाहेर काढले व इस्पितळात पोहोचवले; मात्र रुग्णालयात पोहोचल्यानंतर मुलाचा दुर्दैवी अंत झाला तर मुलीवर उपचार सुरू आहे.

Web Title: The wall of the toilet collapsed on the siblings; Brother killed, sister seriously injured