Video : थरारक ! नदीच्या पुरात जीप वाहून गेली; एका प्रवाशाने झाडावर चढून वाचवला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 02:19 PM2021-09-07T14:19:18+5:302021-09-07T14:21:13+5:30

rain in nanded : प्रवासी झाडावर चढून बसला असून त्याच्यापर्यंत पोहचण्याचे प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहेत. 

Thrilling! The jeep was swept away in the river flood; A passenger climbed a tree and saved a life | Video : थरारक ! नदीच्या पुरात जीप वाहून गेली; एका प्रवाशाने झाडावर चढून वाचवला जीव

Video : थरारक ! नदीच्या पुरात जीप वाहून गेली; एका प्रवाशाने झाडावर चढून वाचवला जीव

googlenewsNext

मुखेड ( नांदेड ) : नांदेड जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे. तब्बल सर्वच तालुक्याला पावसाचा तडाखा बसला आहे. मुखेडमध्येही जोरदार पावसाने दाणादाण उडाली असून शहरालगतच्या फुलेनगर परिसरात पाणी शिरले आहे. याच भागातून जाणाऱ्या मोतिनाला नदीच्या पुरात एक जीप वाहून गेली. यातील एका प्रवाशाने बाहेर पडून झाडाचा आसरा घेत जीव वाचवला आहे. या गाडीत किती प्रवासी होते याची माहिती अद्याप मिळाली नाही.

मुखेड शहरातील फुलेनगर भागाला मुसळधार पावसाने फोटो फटका बसला आहे. या भागात पाणी शिरले असून नागरिकांचे हाल होत आहेत. दरम्यान, फुले नगरच्या जवळून जाणाऱ्या मोतीनाला नदीला पूर आला आहे. यात सकाळी १० वाजेच्या सुमारास एक चारचाकी वाहून गेली. या परिस्थितीत एकाने गाडीतून बाहेर पडत नदी काठच्या झाडाचा आसरा घेतला. तो प्रवासी झाडावर चढून बसला असून त्याच्यापर्यंत पोहचण्याचे प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहेत. 

या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तहसीलदार काशिनाथ पाटील, गटविकास अधिकारी तुकाराम भालके, मुख्याधिकारी विजय चव्हाण  आणि पोलिस निरिक्षक विलास गोबाडे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्रवाशाला सुखरूप काढण्याच्या यंत्रणेला सूचना दिल्या. मात्र, पाण्याचा वेग जोरदार असल्याने त्या प्रवाशापर्यंत पोहचण्यास अडथळा निर्माण होत आहे. नांदेड येथील पथकाला बचाव कार्यासाठी पाचारण करण्यात आले असल्याची माहिती आहे.

हेही वाचा - नांदेड जिल्ह्यातील ८० मंडळात मुसळधार पाऊस; विष्णुपुरीचे १० दरवाजे उघडले

Web Title: Thrilling! The jeep was swept away in the river flood; A passenger climbed a tree and saved a life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.