शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

विरहाच्या विचाराने टोकाचे पाऊल उचलले; प्रेमी युगुलाने गळफास घेऊन जीवन संपवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 19:13 IST

विवाहित तरुणी सासर सोडून काही वर्षांपासून मामाकडे राहत असल्याने तरुणाच्या कुटुंबातून लग्नाला होता विरोध

ठळक मुद्देमुलाच्या लग्नाची तयारी सुरु होतीविवाहित तरुणी सासर सोडून मामाकडे राहत होती

नांदेड : हिमायतनगर तालुक्यातील कामारवाडी येथे एकमेकांसोबत प्रेमाच्या आणाभाका घेतलेल्या प्रेमी युगुलाच्या लग्नाला घरच्या मंडळींनी विरोध केल्यानंतर त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी पहाटे तीन वाजता उघडकीस आली.

कामारवाडी येथील दत्ता गणेश भिंगोरे (२४) व विवाहित शारदा खंडू माने (२५, रा. चिकाळा) यांचे प्रेमसंबंध होते. विवाहिता ही पतीशी पटत नसल्यामुळे गेल्या चार वर्षांपासून मामाकडे कामारवाडी येथे वास्तव्यास होती. याच ठिकाणी दोघांचे सूत जुळले. मात्र, दोघांच्या संबंधांची कुणकुण नातेवाइकांना लागली. शारदा ही विवाहित असल्यामुळे भिंगोरे यांच्या कुटुंबीयांनी प्रेम संबंधाला विराेध होता. तसेच दत्ता याच्या घरच्या मंडळींनी त्याच्या लग्नाची तयारी सुरू केली होती. सोयरीकही जुळवून आली होती. मात्र, दत्ताने शारदासोबत प्रेमाच्या आणाभाका घेतल्या होत्या. लग्न झाल्यानंतर त्याला शारदापासून कायमचे दूर व्हावे लागत होते.

विरहाच्या विचाराने उचलले टोकाचे पाऊलविरहाच्या विचाराने दोघेही निराश झाले होते. त्यामुळे त्यांनी सोबत जगता येत नसेल तर सोबत मृत्यूला जवळ करण्याचा टोकाचा निर्णय घेतला. गावाशेजारील चंद्रकुमार वानखेडे यांच्या शेतात लिंबाच्या झाडाला पहाटे तीन वाजेच्या सुमारास त्यांनी गळफास घेतला. घटना उघडकीस आल्यानंतर पोलीस पाटील नागोराव भिंगोरे यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. कामारवाडी येथे दुपारी एकाच चितेवर दोघांवरही अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणाचा तपास पोउपनि हेमंत चोले हे करीत आहेत.

टॅग्स :NandedनांदेडDeathमृत्यू