सिडको प्रकल्प अंतर्गत पोलीस वसाहतीसाठी जागेची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:16 AM2021-01-17T04:16:21+5:302021-01-17T04:16:21+5:30

संबंधित अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल पाठविला होता. परंतु काही दिवसांच्या कालावधीनंतर दोन्ही अधिकारी यांची बदली झाली ...

Site inspection for police colony under CIDCO project | सिडको प्रकल्प अंतर्गत पोलीस वसाहतीसाठी जागेची पाहणी

सिडको प्रकल्प अंतर्गत पोलीस वसाहतीसाठी जागेची पाहणी

Next

संबंधित अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल पाठविला होता. परंतु काही दिवसांच्या कालावधीनंतर दोन्ही अधिकारी यांची बदली झाली व जागेसंदर्भात काही हालचाली झाल्या नाहीत. अखेर या पोलीस वसाहती संदर्भात १५ जोनवारी रोजी नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक कायार्लयात जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे व पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड, सिडको प्रशासक भुजंग गायकवाड, विकास अधिकारी कपिल राजपूत यांच्यात झालेल्या बैठकीत पोलीस वसाहतीसाठी गट नंबर ३० मधील जागेसंदर्भात चर्चा झाली. यावेळी याठिकाणी किती खोल्या, संबंधित जागेचे किती शुल्क यासह अन्य बाबींवर सविस्तर चर्चा झाली. यावेळी सिडको व प्रशासनाने जागेसंदर्भात सविस्तर अहवाल सादर केला. चर्चेनंतर दोन पोलीस कर्मचारी यांनी जागेची पाहणी करून जागेचा फोटो वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविला आहे. या जागेवर पोलीस वसाहत झाल्यास सिडकोच्या वैभवात भर पडणार आहे.

Web Title: Site inspection for police colony under CIDCO project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.