शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल संकटातून दिलासा मिळणार? अमेरिकेने रशियन तेलावरील सूट वाढवली; भारताला कसा होणार फायदा?
2
Top Marathi News LIVE: "महागाई मॅन आता आणखी वसुली करेल"; काँग्रेसची केंद्र सरकारवर टीका
3
विधानसभा अध्यक्षांचा ‘प्रस्ताव’ बेस्टकडून माघारी पाठविण्यात आला, प्रवाशांच्या हिताविरोधात असल्याचा आरोप
4
एकाच महिलेचे ४ प्रियकर; सुपारी देऊनही नवरा वाचला, उशीने तोंड दाबून बेडवरच संपवला! ऐकून अंगावर येईल काटा
5
अमेरिकेची दादागिरी चालणार नाही; भारत रशियाकडून तेल खरेदी करणारच, सरकारचा स्पष्ट संदेश
6
सेल्फी, लॅप ऑफ ऑनर आणि MS धोनी-रैना जोडीची खास भेट; चेपॉकवरील भावूक क्षण (VIDEO)
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी पुन्हा विध्वंसाची भाषा; म्हणाले, "चर्चा यशस्वी झाली नाही, तर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला करू"
8
शिवराज मोटेगावकरच्या अटकेनंतर ‘सीबीआय’चा महाराष्ट्रातील मुक्काम वाढला, तपासणी सत्र सुरूच!
9
समुद्रात दादागिरी! इराणने 'होर्मुझ स्ट्रेट'वर लागू केला स्वतःचा कायदा; एका जहाजाकडून वसूल करताहेत 'इतके' कोटी
10
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
11
"माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परतणार!" शेख हसीना यांचा बांगलादेशला थेट इशारा
12
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
13
अधिक मास २०२६: अधिक महिन्यात विवाहित मुलीने आईची ओटी का भरावी? सविस्तर वाचा
14
मधुचंद्राच्या रात्री असं काय घडलं की नवरदेवाने दुसऱ्याच दिवशी आयुष्य संपवलं? नवरीसह ४ जणांवर गुन्हा दाखल!
15
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
16
San Diego Firing : 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली
17
Video: ‘मी महाराष्ट्र सोडून जाऊ का?’ नाना पाटेकर भावुक
18
शिंदेसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप करणार उमेदवारीसाठी दावा; विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले
19
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
20
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
Daily Top 2Weekly Top 5

शक्तीपीठ महामार्ग रद्द करा नाहीतर सामूहिक मरणाची परवानगी द्या! शेतकऱ्यांचे रक्ताने पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 13:15 IST

शक्तीपीठ महामार्गात जाणाऱ्या सुपीक जमिनीसाठी नांदेडच्या २०० शेतकऱ्यांची सामूहिक इच्छा मरणाची मागणी

- शरद वाघमारे
मालेगाव (नांदेड):
संपूर्ण जग जेव्हा २०२६ च्या नववर्षाचे स्वागत जल्लोषात करत होते, तेव्हा नांदेड जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी आपल्या रक्ताने लिहिलेले एक हृदयद्रावक निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना सादर केले. नियोजित शक्तीपीठ महामार्ग कायमचा रद्द करावा, अन्यथा आम्हाला सामूहिक रित्या 'इच्छा मरणाची' परवानगी द्यावी, अशी आर्त साद या निवेदनाद्वारे घालण्यात आली आहे.

बागायती जमिनीवर कुऱ्हाड? 
नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर आणि मालेगाव परिसरातील सुपीक बागायती जमीन, जिथली केळी आणि हळद थेट विदेशात निर्यात केली जाते, ती या महामार्गामुळे नष्ट होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. पूर्ण आणि अप्पर पेनगंगा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील या जमिनी वाचवण्यासाठी शेतकरी गेल्या पावणेदोन वर्षांपासून निकराचा लढा देत आहेत. प्रशासकीय पथकाची मोजणी रोखून धरल्यानंतर आता शासनाच्या दमनकारी धोरणाला वैतागून शेतकऱ्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे.

कोल्हापूरप्रमाणे आम्हालाही न्याय द्या! 
"नुकतेच विधिमंडळात सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्गाचे आरेखन बदलण्याचे संकेत सरकारने दिले आहेत. तिथे जर समांतर मार्ग असल्याचे कारण दिले जाते, तर आमच्या भागातूनही अवघ्या ३ ते ८ किमी अंतरावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ (नागपूर-रत्नागिरी) अस्तित्वात आहे. मग आमच्याच सुपीक जमिनींचा बळी का घेतला जात आहे?" असा सवाल कृती समितीचे समन्वयक सुभाष मोरलवार आणि सतीश कुलकर्णी यांनी उपस्थित केला आहे.

लढा अधिक तीव्र करण्याचा इशारा 
या निवेदनावर शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समितीचे समन्वयक सुभाष मोरलवार, सतीश कुलकर्णी, गजानन तीमेवार, प्रमोद इंगोले, कचरू मुधळ यांच्यासह विठ्ठलराव गरुड, पराग अडकिने, प्रदीप गावंडे, ज्ञानोबा हाके, अनिल चव्हाण, बापूराव ढोरे, ईश्वर सवंडकर, दिलीप कराळे, धोंडीराम कल्याणकर, सतीश देसाई, बालाजी इंगोले, सुभाष कदम, तुकाराम  खुर्दा मोजे, सोनाजी बुट्टे, माधव इंगोले, शंकर तिमेवार, सुरज मालेवार, आनंदराव नादरे, दिलीप भिसे यांच्यासह  २०० हून अधिक बाधित शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असून, जर शासनाने यावर तातडीने तोडगा काढला नाही, तर हा लढा अधिक तीव्र करण्याचा इशारा कृती समितीने दिला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Scrap Shaktipeeth Highway or Allow Mass Suicide: Farmers' Bloody Plea

Web Summary : Nanded farmers, facing displacement by the Shaktipeeth Highway, implore the government to cancel the project or grant them euthanasia. They argue the highway threatens fertile land and livelihoods, similar to Kolhapur's situation where route changes were considered. Farmers threaten intensified protests if demands are unmet.
टॅग्स :Shaktipeeth Mahamargशक्तिपीठ महामार्गNandedनांदेडFarmerशेतकरी