शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
4
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
5
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
6
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
7
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
8
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
9
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
10
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
11
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
12
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
13
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
14
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
15
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
16
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
17
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
18
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
19
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
20
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर

मराठवाड्यात अतिवृष्टीग्रस्तांना मिळणार पावणे तीन कोटींची भरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 6:16 PM

एप्रिल ते आॅक्टोबर २०१७ या कालावधीत अतिवृष्टी व अवेळी पावसामुळे झालेल्या शेतपिकाच्या नुकसानीपोटी  शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

ठळक मुद्दे मराठवाड्यातील ४ हजार ९२० शेतकऱ्यांना २ कोटी ८३ लाखांची नुकसान भरपाई मिळणार आहे.

- विशाल सोनटक्के

नांदेड : एप्रिल ते आॅक्टोबर २०१७ या कालावधीत अतिवृष्टी व अवेळी पावसामुळे झालेल्या शेतपिकाच्या नुकसानीपोटी  शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यामुळे मराठवाड्यातील ४ हजार ९२० शेतकऱ्यांना २ कोटी ८३ लाखांची नुकसान भरपाई मिळणार आहे. यासंदर्भातील पत्र नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाला बुधवारी प्राप्त झाले आहे. 

ही मदत महसूल व कृषी विभागाच्या क्षेत्रिय अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेल्या संयुक्त पंचनाम्याच्या आधारे पिकांचे ३३ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त नुकसान झाल्याबाबत देण्यात येणार आहे. ही रक्कम बाधितांच्या बँक खात्यात थेट जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याबरोबरच रक्कम खात्यात जमा करताना कोणत्याही बँकेने कोणत्याही प्रकारची वसुली करु नये. याबरोबरच नुकसान भरपाईचे वाटप केल्यानंतर सदर लाभार्थ्यांची यादी त्यांना प्रदान केलेल्या रक्कमेच्या माहितीसह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्याचे आदेश महसूल विभागाने दिले आहे. 

नांदेड-लातूरला सर्वाधिक नुकसानभरपाईएप्रिल ते आॅक्टोबर २०१७ या कालावधीत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच अवेळी पाऊस झाल्याने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मराठवाड्यातील ३ हजार ८८१ हेक्टर क्षेत्राला याचा फटका बसला होता. शासनाने जाहीर केलेल्या नुकसान भरपाईत लातूर जिल्ह्याला सर्वाधिक ९२ लाख ७६ हजार तर नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ८५ लाख ४० हजार रुपये मिळणार आहेत. औरंगाबाद १० लाख २९ हजार, जालना- १२ लाख २९ हजार, परभणी- ७० लाख, ७ हजार, बीड- ६ लाख ७७ हजार, हिंगोली ५ लाख १९ हजार तर उस्मानाबाद जिल्ह्यातील दोन बाधित शेतकऱ्यांना २४ हजारांची नुकसान भरपाई मिळणार आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीfundsनिधीRainपाऊसState Governmentराज्य सरकारMarathwadaमराठवाडा