शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

धोकादायक विद्युत पोलमुळे जीवितास धोका

By admin | Updated: May 9, 2014 00:30 IST

नवीन नांदेड : नवीन नांदेडातील वसरणी येथे महात्मा फुले चौक ते नावघाट रस्त्यावरील धोकादायक विद्युत पोलमुळे नागरिकांच्या जिवास धोका निर्माण झाला आहे़

 नवीन नांदेड : नवीन नांदेडातील वसरणी येथे महात्मा फुले चौक ते नावघाट रस्त्यावरील धोकादायक विद्युत पोलमुळे नागरिकांच्या जिवास धोका निर्माण झाला आहे़ हे पोल तात्काळ बदलण्याची मागणी प्रभाग ३६ चे नगरसेवक संजय मोरे यांनी महावितरणच्या मुख्य अभियंत्यांकडे केली आहे़ वसरणीतील महात्मा फुले चौकातील डी़ पी़ क्रमांक ४६३ सह नावघाट रस्त्याकडे जाणारे बहुतांश विद्युत पोल झुकले आहेत़ या पोलची अवस्था अशी झाली आहे की ते कधीही कोसळतील़ विद्युतप्रवाह सुरू असताना हा प्रकार घडल्यास अनेकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो़ पोल क्र ७३ व ७४ हे तर गंजलेल्या अवस्थेत आहे़ सध्या वादळीवारे आणि पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे़ अशा परिस्थतीत धोका आणखीणच वाढला आहे़ वसरणी भागातील शंकरनगर, रहिमपूर भागात अनेकांना दिलेली वीजजोडणी ही बर्‍याच अंतरावरील पोलवरून देण्यात आली आहे़ या भागात नवीन पोल टाकण्यात यावेत अशी मागणीही नगरसेवक मोरे यांनी केली आहे़ वसरणीतील झुकलेल्या पोलबाबत यापूर्वीही महावितरणशी पत्रव्यवहार केला होता़ मात्र त्याकडे दुर्लक्षच झाल्याचे दिसत आहे़ हे धोकादायक पोल न बदलल्यास महावितरणच्या एमआयडीसी कार्यालयासमोर १५ मे पासून उपोषण करण्याचा इशाराही नगरसेवक मोरे यांनी दिला आहे़ (प्रतिनिधी)