राकाँच्या शहराध्यक्षावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:23 IST2020-12-30T04:23:37+5:302020-12-30T04:23:37+5:30

शहरातील बिलालनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. फेरोजखान इलीयासखान इनामदार यांचा खासगी दवाखाना आहे. त्या ठिकाणी २८ रोजी दुपारी ...

Rak's mayor charged with molestation | राकाँच्या शहराध्यक्षावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

राकाँच्या शहराध्यक्षावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

शहरातील बिलालनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. फेरोजखान इलीयासखान इनामदार यांचा खासगी दवाखाना आहे. त्या ठिकाणी २८ रोजी दुपारी गेलेल्या यातील पीडित महिलेने डॉ. इनामदार यांना विचारणा केली की, तुम्ही माझ्या सासऱ्याच्या इनामी जागेवर अतिक्रमण का केले? यामुळे संतप्त झालेल्या आरोपीने शहरातील सर्व इनामी जमीन माझ्या मालकीची आहे, मी इथला इनामदार आहे, असे म्हणून पीडित महिलेस अश्लील शिवीगाळ करीत विनयभंग केला. याबाबत पीडित महिलेच्या फिर्यादीवरून आरोपी डॉ. फेरोजखान इलीयासखान इनामदारविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरचिटणीसपदी पाटील

हिमायतनगर : हिमायतनगर तालुक्यातील सोनारी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती सुधारक पाटील सोनारीकर यांची भाजपा नांदेड जिल्हा किसान मोर्चा सरचिटणीसपदी निवड झाली. २९ रोजी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर, भाजपा नांदेड जिल्हा अध्यक्ष व्यंकटराव पाटील, जिल्हा संघटनमंत्री गंगाधरावजी जोशी यांच्या उपस्थितीत सुधाकर पाटील सोनारीकर यांची नांदेड जिल्हा किसान मोर्चा सरचिटणीसपदी निवड करण्यात आली.

Web Title: Rak's mayor charged with molestation