नांदेड: विद्यार्थीनीला व्हिडीओ कॉल करून अश्लील चाळे केल्याचा आरोप, मुख्याध्यापकाने आयुष्यच संपवलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 20:24 IST2025-03-29T20:19:43+5:302025-03-29T20:24:58+5:30
Nanded News: नांदेडमधील एका खासगी शाळेत एक धक्कादायक घटना घडली आहे. व्हिडीओ कॉल करून अश्लील चाळे केल्याचा आरोप एका विद्यार्थीने केला. त्यानंतर मुख्याध्यापकाने आयुष्यच संपवलं.

नांदेड: विद्यार्थीनीला व्हिडीओ कॉल करून अश्लील चाळे केल्याचा आरोप, मुख्याध्यापकाने आयुष्यच संपवलं
Nanded Latest news: एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका विद्यार्थीने आरोप केला की, तिला मुख्याध्यापकाने व्हिडीओ कॉल केला. त्यानंतर मुख्याध्यापकाने कॉलवर अश्लील चाळे केले. हे सगळं विद्यार्थीनीने तिच्या आईवडिलांना सांगितले. त्यानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात गेले आणि मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल झाला. हे घडल्यानंतर मुख्याध्यापकाने थेट आत्महत्या करून आयुष्य संपवले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
नांदेड शहरापासून जवळच असलेल्या पसादगावमध्ये ही घटना घडली. विद्यार्थीनी एका खासगी शाळेत शिकते. ती दहावीला आहे. तिने आईवडिलांना सांगितल्यानंतर हे प्रकरण पोलीस ठाण्यात गेले.
विद्यार्थीनीला व्हिडीओ कॉल का केला?
दहावीत शिकत असलेल्या विद्यार्थीने आरोप केला की, तिला मुख्याध्यापकाने उत्तरपत्रिका तपासण्यासंदर्भात कॉल केल्याचे कारण सांगितले. व्हिडीओ कॉल केल्यानंतर मुख्याध्यापकाने अश्लील चाळे केले.
हेही वाचा >>मृतदेह बॅगेत भरून पळालेल्या पतीस अटक; आत्महत्येचा प्रयत्न करणारा पती रुग्णालयात दाखल
विद्यार्थीनीने याबद्दल तिच्या आईवडिलांना सांगितले. आईवडिलांनी थेट शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठले आणि मुख्याध्यापकाविरोधात तक्रार दिली. यासंदर्भात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. विद्यार्थीनी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी पोक्सो कायद्यांर्गत एफआरआय नोंदवला.
मुख्याध्यापक घाबरला अन्...
दरम्यान, आपल्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती मुख्याध्यापक सुनील कारामुंगे यांना कळली. त्यामुळे ते घाबरले. या घटनेमुळे आपली बदनामी होईल, या भीतीपोटी त्यांनी विषारी पदार्थ खाऊन आत्महत्या केली.
सुनील कारामुंगे यांनी विषारी पदार्थ खाल्याचे कळताच कुटुंबीयांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. शुक्रवारी दुपारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत काय?
मयत मुख्याध्यापक सुनील कारामुंगेनी मृत्यू होण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात त्यांनी म्हटलेले आहे की, विद्यार्थीनीच्या कुटुंबीयांनी मला मानसिक त्रास दिला आहे. त्यामुळे मी आत्महत्या करत आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी विद्यार्थीनी आणि तिच्या आईवडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.