शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

स्ट्राँगरूम परिसरात कडक पोलीस बंदोबस्त, नागरिकांना प्रतिबंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 00:52 IST

नांदेड लोकसभा मतदार संघासाठी गुरुवार, १८ एप्रिल रोजी मतदान पार पडले. त्यानंतर सर्व केंद्रावरून सील करून आलेल्या ईव्हीएम नांदेडच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील माहिती व तंत्रज्ञान इमारतीमध्ये उभारण्यात आलेल्या स्ट्रॉंगरुममध्ये विधानसभा मतदारसंघनिहाय सीलबंद करून ठेवण्यात आलेल्या आहेत.

ठळक मुद्देशासकीय तंत्रनिकेतन परिसरात स्ट्राँगरुम

नांदेड : नांदेडलोकसभा मतदार संघासाठी गुरुवार, १८ एप्रिल रोजी मतदान पार पडले. त्यानंतर सर्व केंद्रावरून सील करून आलेल्या ईव्हीएम नांदेडच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील माहिती व तंत्रज्ञान इमारतीमध्ये उभारण्यात आलेल्या स्ट्रॉंगरुममध्ये विधानसभा मतदारसंघनिहाय सीलबंद करून ठेवण्यात आलेल्या आहेत.स्ट्रॉंगरुम परिसरात मोठ्या पोलीस बंदोबस्तासह सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या परिसराला त्रिस्तरीय सुरक्षायंत्रणा ठेवण्यात आलेली आहे. प्रथमत: सीआरपीएफ प्लाटून नंतर एसआरपीएफचे जवान तसेच बाहेरील बाजूस पोलीस यंत्रणा सुरक्षिततेसाठी सज्ज करण्यात आली आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार सदरील इमारतीपासून १०० मीटर परिसर प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यामुळे कोणालाही स्ट्रॉंगरूम परिसरात प्रवेश राहणार नाही. या इमारतीत नियुक्त करण्यात आलेले अधिकारी, कर्मचारी व त्या परिसरात नियुक्त करण्यात आलेले कामगार यांना जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून ओळखपत्र देण्यात आले आहेत. उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांना रजिस्टरवर नोंद करून प्रवेश देण्यात येईल.स्ट्रॉंगरूमसाठी वर्ग-१ व २ चे अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. दर ८ तासांनी अधिकाऱ्यांकडून स्ट्रॉंगरूम परिसराची तपासणी करण्यात येणार आहे. उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींना स्ट्राँग रुम परिसरात पाहणीसाठी परवानगीने तंबू लावता येणार आहे.नांदेड लोकसभा मतदार संघासाठी १८ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. मतदारसंघात ६५.१५ टक्के मतदान झाले. या मतदानासाठी वापरण्यात आलेल्या ईव्हीएम मशीन तसेच व्हीव्हीपॅट गुरुवारी पहाटेपर्यंत नांदेड मतदारसंघांतर्गत असलेल्या सहा विधानसभा मतदारसंघातील शहरातील तंत्रनिकेतन महाविद्यालयातील स्ट्राँगरुममध्ये आणण्यात आल्या.स्ट्राँग रुममध्ये या मशीन विधानसभा मतदारसंघनिहाय ठेवण्यात आल्या आहेत. जिल्हा निवडणूक अधिकारी अरुण डोंगरे, पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी पहिल्या दिवशीच स्ट्राँगरुमला भेट दिली.शस्त्रधारी पोलिसांचा पहाराशहरातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या माहिती व तंत्रज्ञान इमारतीमध्ये असलेल्या स्ट्राँगरुमवर सीआरपीएफ, एसआरपीएफ जवानांची करडी नजर राहणार आहे. त्याचवेळी या स्ट्राँगरुमच्या बाहेरील बाजूस पोलीस यंत्रणा तैनात करण्यात आली आहे.

टॅग्स :lok sabhaलोकसभाnanded-pcनांदेडVotingमतदान