मराठवाडा प्रश्नी पंकजा मुंडे यांचे उपोषण म्हणजे, 'देर आये दुरुस्त आये'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2020 06:24 PM2020-01-27T18:24:13+5:302020-01-27T18:25:26+5:30

जेव्हा पाच वर्षे त्यांची सत्ता होती तेव्हा त्यांना मराठवाड्याचा प्रश्न आठवला नाही

Pankaja Munde fasting in Marathwada question means 'come late, but its better' | मराठवाडा प्रश्नी पंकजा मुंडे यांचे उपोषण म्हणजे, 'देर आये दुरुस्त आये'

मराठवाडा प्रश्नी पंकजा मुंडे यांचे उपोषण म्हणजे, 'देर आये दुरुस्त आये'

googlenewsNext

नांदेड : पंकजा मुंडे यांचे मराठवाड्याच्या सिंचन प्रश्नावर उपोषण देर आये दुरुस्त आये अशा स्वरूपाचे असून त्यांचे याबाबत अभिनंदन. मात्र जेव्हा पाच वर्षे त्यांची सत्ता होती तेव्हा त्यांना मराठवाड्याचा प्रश्न आठवला नाही अशी खोचक प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी पंकजा मुंडे यांच्या उपोषणावर दिली. 

मराठवाड्यातील सिंचनाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी पुढाकार घेणार असून याच प्रश्नासाठी पूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना आपण भेटलो होतो पण त्यांनी काहीच केले नाही अशी टीका चव्हाण यांनी यावेळी केली. तसेच पंकजा मुंडेचे मी अभिनंदन करतो, त्या चांगलं काम करत आहेत. त्यांच्या मागण्या मी ऐकून घेईल, तसेच या प्रश्ना संदर्भात सिचनमंत्राना भेटून प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही चव्हाण म्हणाले. 

Web Title: Pankaja Munde fasting in Marathwada question means 'come late, but its better'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.