Nanded: काळजाचा ठोका चुकवणारी घटना! हदगाव तालुक्यात २ भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 12:19 IST2026-01-05T12:19:09+5:302026-01-05T12:19:52+5:30

दोन घरे उद्ध्वस्त, दोन चिमुरड्यांच्या डोक्यावरचं छत्र हरवलं!

Nanded: Heartbreaking incident! Two people died in two horrific accidents in Hadgaon taluka | Nanded: काळजाचा ठोका चुकवणारी घटना! हदगाव तालुक्यात २ भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

Nanded: काळजाचा ठोका चुकवणारी घटना! हदगाव तालुक्यात २ भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

हदगाव (नांदेड): नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच हदगाव तालुक्यात अपघातांचे सत्र सुरू झाले असून, रविवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. दगडवाडी येथील अनंत वानखेडे आणि हदगाव येथील सुवर्णकार गोविंद रत्नपारखी यांच्या निधनाने संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पहिला अपघात: 
दगडवाडीचा तरुण जागीच ठार दगडवाडी येथील २२ वर्षीय अनंत सूर्यकांत वानखेडे हे रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास दुचाकीवरून वाळकीहून आपल्या गावाकडे परतत होते. यावेळी समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरशी त्यांची जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, अनंत यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि एक लहान मुलगा असा परिवार आहे.

दुसरा अपघात: 
युवा उद्योजकाची प्राणज्योत मालवली दुसरी घटना हदगाव शहरात रात्री ८ च्या सुमारास घडली. शहरातील सुवर्णकार ज्वेलर्सचे मालक गोविंद रत्नपारखी (३५) हे आपल्या मित्राच्या बुलेटवरून हदगावकडे परतत असताना पंचशील शाळेसमोर त्यांच्या बुलेटला ऑटोने धडक दिली. उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना नांदेडला हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. अत्यंत शांत आणि संयमी स्वभाव असलेल्या गोविंद यांच्या जाण्याने रत्नपारखी कुटुंबाचा आधार हरपला आहे.

दोघे गंभीर जखमी 
या अपघातांमध्ये ऑटो चालक रवी बाबाराव दवणे (रा. हदगाव) यांची प्रकृती गंभीर असून त्यांना नांदेड येथे हलवण्यात आले आहे. तसेच ऑटोमधील प्रवासी सुधाकर रामराव वाघमारे (रा. गोजेगाव) यांना उपचारासाठी उमरखेड येथे दाखल करण्यात आले आहे. सोमवार, ५ जानेवारी रोजी दोन्ही मृतांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title : नांदेड: हदगाँव में दो भीषण दुर्घटनाओं में दो युवाओं की मौत

Web Summary : नांदेड जिले के हदगाँव में दो अलग-अलग दुर्घटनाओं में दो युवकों की जान चली गई। अनंत वानखेड़े की मौत ट्रैक्टर से टक्कर में हुई, जबकि गोविंद रत्नपारखी ने मोटरसाइकिल दुर्घटना के बाद दम तोड़ दिया। इन घटनाओं से पूरे क्षेत्र में शोक की लहर है।

Web Title : Two Fatal Accidents in Hadgaon Claim Two Young Lives

Web Summary : Two separate accidents in Hadgaon, Nanded district, claimed the lives of two young men. Anant Wankhede died in a collision with a tractor, while Govind Ratnaparkhi succumbed to injuries after a motorcycle accident. The incidents have cast a pall of gloom over the region.