शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
2
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
3
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
4
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
5
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
6
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
7
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
8
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
9
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
10
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
11
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
12
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
13
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
14
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
15
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
16
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
17
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
18
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
19
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
20
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

Nanded: पराभूत उमेदवाराच्या घरासमोर मध्यरात्री फटाके फोडून दिली जीवे मारण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 16:14 IST

भाजपच्या पराभूत उमेदवाराच्या घरासमोर मध्यरात्री शिंदेसेनेच्या जिल्हाप्रमुखाने फटाके फोडून दिली धमकी!

नांदेड: नांदेड महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर शहरात अनेक ठिकाणी जल्लोष पाहायला मिळाला. मात्र, तरोडा परिसरात या जल्लोषाला गालबोट लागले आहे. भाजपचे पराभूत उमेदवार दीपक पाटील यांच्या घरासमोर १८ जानेवारीच्या मध्यरात्री विजयी उमेदवाराचे वडील आणि शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख उमेश मुंडे यांनी आपल्या समर्थकांसह फटाके फोडून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

नेमकी घटना काय? 
तरोडा भागातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवलेले दीपक पाटील यांचा पराभव झाला आहे. पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रविवारी मध्यरात्री त्यांच्या घरासमोर शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख उमेश मुंडे, वैभव मठपती, संदीप जनकवाडे आणि शेकापुरे हे चार जण आले. त्यांनी फटाके फोडून गोंधळ घातला. इतकेच नाही तर, "तुझा संतोष देशमुखसारखा गेम वाजवू," अशी धमकीही दिल्याचे पाटील यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

व्हिडीओ व्हायरल, राजकीय वातावरण तापले
या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले असून ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. यामध्ये घरासमोर फटाके वाजवले जात असल्याचे स्पष्ट दिसत आहे. दीपक पाटील यांनी या पुराव्यासह भाग्यनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. मात्र, पोलिसांनी याप्रकरणी केवळ 'अदखलपात्र' गुन्ह्याची नोंद केली आहे. निवडणूक संपल्यानंतरही अशाप्रकारे वैयक्तिक द्वेष काढला जात असल्याने नांदेडमधील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लोकशाहीत हार-जीत होत असते, मात्र पराभूत उमेदवाराच्या कुटुंबाला अशाप्रकारे दहशतीखाली ठेवणे किती योग्य, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Nanded: Defeated candidate threatened with death after post-election fireworks.

Web Summary : In Nanded, a defeated BJP candidate received death threats after alleged supporters of a winning candidate set off fireworks outside his home. The incident, captured on CCTV, has sparked outrage, raising concerns about post-election intimidation. Police registered a non-cognizable offense.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Nanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिकाCrime Newsगुन्हेगारी