शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
4
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
5
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
7
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
8
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
9
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
10
Khandavi Recipe: कढईत पीठ न शिजवता करा परफेक्ट सुरळीची वडी; वेळ आणि मेहनत दोन्ही वाचवणारी रेसिपी
11
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
12
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
13
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
14
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
15
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
16
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
17
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
18
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
19
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
20
श्रद्धेचा गैरफायदा घेत भोंदूंचा ‘काळा खेळ’; जादूटाेणा, करणीचा कहर​​​​​​​, टणटण बाबासह शिष्य जेरबंद
Daily Top 2Weekly Top 5

Nanded: लोह्यात आभाळ फाटले; लिंबोटी धरणातून विसर्ग वाढला, अनेक घरांत पाणी शिरले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 10:44 IST

नांदेड - लातूर राष्ट्रीय महामार्ग गेल्या चार तासांपासून वाहतुकीसाठी बंद आहे

- गोविंद कदम 

लोहा ( नांदेड): तालुक्यात पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जणू आभाळच फाटल्याचे चित्र निर्माण झाले आहे. उर्ध्व माणार प्रकल्पांतर्गत लिंबोटी धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत आहे. वाढत्या पाणलोट क्षेत्रामुळे विसर्ग वाढविण्यात आला असून २७ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता ११ दरवाजे २ मीटर व ४ दरवाजे १.५ मीटरने उघडण्यात आले आहेत. सध्या ८४,६५६.७८ क्यूसेक पाणी विसर्ग सुरू असल्याची माहिती प्रकल्प प्रशासनाने दिली.

पहाटेपासून कोसळणाऱ्या पावसामुळे शहरातील जुना लोहा व परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून नागरिकांची तारांबळ उडाली आहे. दरम्यान, नांदेड–लातूर राष्ट्रीय महामार्ग गेल्या चार तासांपासून वाहतुकीसाठी बंद झाला आहे. यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

पुरस्थितीचा संभाव्य धोका लक्षात घेऊन नदीकाठच्या गावांमधील नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन लोहा–कंधार मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर तहसीलदार विठ्ठल परळीकर, लोहा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे तसेच प्रकल्प प्रशासनाने केले आहे.

स्थानिक प्रशासनाने बचाव व आपत्कालीन पथकांना सतर्क राहण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.धरणातील पाण्याची आवक लक्षात घेऊन पुढील विसर्गाबाबत वेळोवेळी निर्णय घेतला जाईल, असे उर्ध्व मानार प्रकल्प अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाशी संपर्क ठेवावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Nanded: Excessive discharge from Limboti Dam floods Loha, disrupts life.

Web Summary : Heavy rain caused Limboti Dam to increase discharge, flooding Loha, Nanded. Homes were inundated, Nanded-Latur highway closed. Residents are urged to be cautious and authorities are on alert.
टॅग्स :NandedनांदेडRainपाऊसfloodपूर