मध्यरात्री बुलडोझर चालवून वृद्धेचे घर पाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 20:08 IST2020-01-16T20:06:50+5:302020-01-16T20:08:34+5:30

शिवाजीनगर पोलीस ठाण्यात २० जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे़

At midnight the bulldozer drove the old women's home at Nanded | मध्यरात्री बुलडोझर चालवून वृद्धेचे घर पाडले

मध्यरात्री बुलडोझर चालवून वृद्धेचे घर पाडले

ठळक मुद्देमगनपुऱ्यातील घटना२० जणांविरुद्ध शिवाजीनगरात गुन्हा नोंद

नांदेड : शहरातील मगनपुरा भागात राहणाऱ्या एका महिलेला शिवीगाळ करुन मध्यरात्री बुलडोझर लावून घर पाडल्याची घटना ९ जानेवारी रोजी घडली़ याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात २० जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे़

सावित्रीबाई हणमंतराव चव्हाण (वय ६५) असे महिलेचे नाव असून ९ जानेवारी रोजी त्या आपल्या मुलांसह घरात झोपलेल्या होत्या़ त्याचवेळी अनिल अशोक मालीवाल, अशोक नंदलाल मालीवाल, मंगल अनिल मालीवाल, सुरजदेवी अशोक मालीवाल, विनायक अशोक मालीवाल, सुशीलादेवी विनायक मालीवाल हे त्या ठिकाणी आले़ त्यांनी चव्हाण यांच्या घरावर दगडफेक केली़ त्यामुळे चव्हाण या शेजारच्या घरी गेल्या़ यावेळी आरोपींनी बुलडोझर लावून त्यांचे घर जमीनदोस्त केले़ 

यावेळी सावित्रीबाई यांनी आरडाओरड केल्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली़  परंतु पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत घर पूर्णपणे पाडण्यात आले होते़ त्यानंतर पोलीस बुलडोझर घेवून निघून गेले़ यावेळी मालीवाल यांच्यासह इतर १५ हून अधिक जण घटनास्थळी होते़ याप्रकरणी सावित्रीबाई चव्हाण यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे़ त्यावरुन २० जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ 

Web Title: At midnight the bulldozer drove the old women's home at Nanded