शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : सरकारचा कलम ३७० च्या नावाने वेळ मारुन नेण्याचा डाव : अशोक चव्हाण  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 20:31 IST

देश आणि राज्यातील इतर समस्यांवरुन लक्ष विचलित करण्याचा डाव

ठळक मुद्देवंचित आघाडीमुळे भाजपाचाच फायदाशिवसेना-भाजपा सरकारचे धोरण शेतकऱ्यांना संपविणारे आहे.

मुदखेड : खोटं बोल पण रेटून बोल, ही भाजप-शिवसेना सरकारची नीती आहे. देश आणि राज्यातील इतर समस्यांवरुन लक्ष विचलित करण्यासाठी कलम ३७० च्या नावाने वेळ मारुन नेण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केला़

युती सरकारने मागील ५ वर्षे राज्यातील सर्वसामान्यांची फसवणूक तसेच दिशाभूल केल्याचे सांगत हा सर्वसामान्य माणूसच या निवडणुकीत शिवसेना-भाजपला धडा शिकवेल़ युपीपीचे पाणी हिंगोली, परभणीकडे वळविण्याचा सरकारचा प्रयत्न सुरु आहे. असे झाल्यास उमरी, धर्माबाद, भोकर, अर्धापूर, हदगाव या तालुक्यांत तीव्र पाणीटंचाई निर्माण होईल. त्यामुळे सरकारचा हा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.चव्हाण यांनी शुक्रवारी मुदखेड तालुक्यातील धनज, खांबाळा, दुधनवाडी, तिरकसवाडी आदी गावांचा प्रचारदौरा केला. त्यानंतर सरेगाव येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी उद्धवराव पवार, संतोष गव्हाणे, माधव पांडागळे, बाळासाहेब देशमुख, गजानन पवार, सदाशिव खवासे, श्यामराव पाटील, अ‍ॅड. वीरभद्र देवठाणकर, उद्धवराव पाटील, सरीता वारकड, पप्पूराव टेकाळे, शिवदास हिपरगे, राजेश कळणे, जीवनराव कळणे आदींची उपस्थिती होती.

ते पुढे म्हणाले, खोट्या आश्वासनांना भुलून देश गमावला. आता राज्य गमावू नका, असे सांगत चांद्रयान मोहीम, कलम ३७० यावर चर्चेचे गुºहाळ गाळले जात आहे. प्रत्यक्षात मागील पाच वर्षांत काय केले? याचा हिशेब या सरकारने मांडला पाहिजे. मात्र पाच वर्षांत सर्वसामान्य कष्टकरी, शेतकऱ्यांच्या तोंडाला केवळ पाने पुसण्याचे काम या सरकारने  केले असल्याने सांगण्यासारखा मुद्दाच नसल्याने कलम ३७० वर वेळ मारुन नेली जात असल्याचे ते म्हणाले. पाच वर्षांत शेतकरी आत्महत्या का थांबल्या नाहीत? बेरोजगारी वाढत आहे, त्यावर काय उपाययोजना केल्या? कर्जमाफी शेतकऱ्यांपर्यंत काय पोहोचली नाही? जाहीर केलेल्या मेगा भरतीचे काय झाले? याची उत्तरे मुख्यमंत्र्यांनी द्यावीत, असे आव्हान चव्हाण यांनी दिले. यावेळी संतोष गव्हाणे यांनी मनोगत व्यक्त केले. शिवसेना-भाजपा सरकारचे धोरण शेतकऱ्यांना संपविणारे आहे. अशी टीकाही त्यांनी केली़  

वंचित आघाडीमुळे भाजपाचाच फायदालोकसभा निवडणुकीत काहींनी वंचित बहुजन आघाडीला मते दिली. त्याचा काय फायदा झाला. या आघाडीमुळे ‘तुला न मला घाल दुसऱ्याला’ अशी अवस्था झाल्याने भाजपाला बळ मिळाले. मराठा, दलित समाजाचे मतदान फोडायचे आणि सत्ता हस्तगत करायची, ही सेना-भाजपाची खेळी असून तोच खेळ आता पुन्हा विधानसभा निवडणुकीतही खेळला जात असल्याचे अशोकराव चव्हाण यांनी सांगितले. गावांच्या भानगडीत मला पाडू नका, गावातील हेवेदावे, तंटे सोडवा पण वड्याचे तेल वांग्यावर काढू नका. त्यामुळे केवळ काँग्रेसचे नुकसान होते, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Ashok Chavanअशोक चव्हाणmukhed-acमुखेडbhokar-acभोकरNandedनांदेड