शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

किनवट राष्ट्रवादीचा अभेद्य किल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 00:54 IST

दोन तालुक्यांचा समावेश असलेल्या किनवट मतदारसंघात माहूरची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसकडे तर किनवटची सत्ता भाजपकडे आहे़ आता आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा हा अभेद्य किल्ला सर करण्यासाठी भाजप आणि शिवसेनेने व्यूहरचना चालविली आहे़

ठळक मुद्देलोकसभा निवडणुकीनंतर सेना-भाजपात संचारला उत्साह

गोकुळ भवरे।किनवट : दोन तालुक्यांचा समावेश असलेल्या किनवट मतदारसंघात माहूरची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसकाँग्रेसकडे तर किनवटची सत्ता भाजपकडे आहे़ आता आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा हा अभेद्य किल्ला सर करण्यासाठी भाजप आणि शिवसेनेने व्यूहरचना चालविली आहे़आदिवासी बंजारा बहुल किनवट विधानसभा मतदारसंघात नऊ वेळा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेला किनवट विधानसभा मतदारसंघ भाजप-सेना युती हिसकावून घेण्यासाठी प्रयत्नशील आहे़ मात्र भाजपात अर्धा डझनहून अधिक इच्छुक असल्याने उमेदवारी न मिळालेल्यांची भूमिका काय असणार? हे काळच सांगेल़राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडी आणि भाजप-सेना युती झाली नाही अणि २०१४ प्रमाणे स्वतंत्र लढले तर आघाडी, युतीला येत्या काळात वंचित बहुजन आघाडी व माजी आमदार भीमराव केराम यांची अपक्ष उमेदवारी डोकेदुखी ठरेल. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला मिळालेल्या यशानंतर भाजपासाठी असलेल्या या मतदारसंघावर शिवसेना दावा करीत असल्याचे त्यांच्या हालचाली वरून दिसून येत आहे़लोकसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार हेमंत पाटील यांना किनवट विधानसभा मतदारसंघात पन्नास टक्केच्यावर मतदान मिळाल्याने शिवसेनेचे मनोबल वाढले आहे़ हा मतदारसंघ शिवसेनेला सुटावा, यासाठी फिल्डिंग लावली जात आहे़ किनवट मतदारसंघात भाजप लयास गेली होती़ भाजपचे कमळ फुलवण्यासाठी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जवळचे मानले जाणारे भाजप नेते अशोक सूर्यवंशी पाटील यांनी प्रयत्न करून किनवट नगरपरिषदेवर व पंचायत समितीवर भगवा फडकवून आपली ताकद दाखवून दिली़ मात्र असे असतानाही एक गट त्यांचे नेतृत्व मानायला तयार नाही़ ते नेहमी त्यांच्या विरोधात सक्रिय असतात़ आता तर धरमसिंग राठोड व इतर अर्धा डझन भाजपाची उमेदवारी मिळावी म्हणून इच्छुक आहेत़ शिवसेनेला हा मतदारसंघ सुटला तर ज्योतीबा खराटे, युवा नेते सचिन नाईक हे दोघे इच्छुक आहेत़राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस आघाडीची उमेदवारी विद्यमान आ़ प्रदीप नाईक यांना बहाल होईल; पण गटबाजी उफळलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांची भूमिका ‘पायात पाय’ घालण्याची राहील हे आ़ प्रदीप नाईकांना ठाऊक आहे़ पण काँग्रेसचा एक प्रबळ गट मात्र नाईकांच्या बाजूने भक्कमपणे राहणार आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आघाडीला व भाजप सेना युतीला अपक्ष उमेदवारी दाखल करणारे माजी आ़भीमराव केराम व बहुजन वंचित आघाडी डोकेदुखी ठरेल माजी आ़भिमराव केराम यांना एखाद्या पक्षाने उमेदवारी दिली तर मग मात्र निवडणुकीचे चित्र फार वेगळे राहील हे तितकेच खरे़

टॅग्स :NandedनांदेडAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस