शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या ४१ दिवसात न्याय; बालिकेवर अत्याचार करुन हत्या करणाऱ्या सालगड्यास फाशीची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 14:55 IST

भोकर तालुक्यातील दिवशी बु. येथे दि. २० जानेवारी रोजी सालगडी असलेल्या आरोपीने पाच वर्षीय बालिकेस गावातीलच कोरड्या नदीपात्रात नेवून तेथे अमानुष अत्याचार करुन क्रुर हत्या केली होती.

ठळक मुद्देभोकर जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल 

भोकर : दिवशी बु. (जिल्हा नांदेड) येथील एका पाच वर्षीय बालिकेवर अत्याचार करुन हत्या केल्या प्रकरणातील आरोपी बाबुराव माळेगावकर ऊर्फ बाबुराव उकंडू सांगेराव यास येथील जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम.एस.शेख यांनी फाशीची शिक्षा दि. २३ रोजी सुनावली आहे. 

भोकर तालुक्यातील दिवशी बु. येथे दि. २० जानेवारी रोजी सालगडी असलेल्या आरोपीने पाच वर्षीय बालिकेस गावातीलच कोरड्या नदीपात्रात नेवून तेथे अमानुष अत्याचार करुन क्रुर हत्या केली होती. त्याच दिवशी सायंकाळी घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात संतापाची लाट उसळली होती.  याबाबत मयत चिमुकलीच्या वडिलांनी भोकर पोलिसात दि. २१ जानेवारी रोजी दिलेल्या तक्रारीवरुन सालगडी बाबुराव उकंडू सांगेराव विरुद्ध  हत्या आणि बाल लैंगिक अत्याचार (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन अटक केली होती. 

घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून व समाजातील रोष पहाता या प्रकरणाचे तपास अधिकारी पो. नि. विकास पाटील यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर १९ दिवसात तपास पूर्ण करुन दि. १० फेब्रुवारी रोजी आरोपी विरुद्ध अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय भोकर येथे दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायालयाने ३९ जणांची साक्ष तपासली तसेच वैद्यकीय पुरावा आणि परिस्थितीजन्य पुराव्यावा ग्राह्य धरुन आरोपी विरुद्ध गुन्हा सिध्द झाल्याने आरोपी बाबूराव उकंडू सांगेराव यास फाशीची शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे अॅड रमेश राजुरकर यांनी काम पाहिले आहे. विशेष म्हणजे न्यायालयाने ४१ दिवसात या प्रकरणात न्याय निवाडा केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीCourtन्यायालयNandedनांदेड