शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

मराठी भाषेवरून विनाकारण गैरसमज पसरवू नका; परिवहन विभागाच्या भूमिकेचे उदय सामंतांकडून समर्थन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 12:06 IST

"महाराष्ट्रात राहतो तर मराठी आलीच पाहिजे!" भाषवेरून होणाऱ्या राजकारणावर उद्योगमंत्री उदय सामंत कडाडले.

नांदेड:मराठी भाषेच्या मुद्द्यावरून काही लोक विनाकारण राजकारण करत असल्याची टीका उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली आहे. रविवारी हदगाव येथे शिवसेना (शिंदे गट) आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यासाठी ते आले होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, परिवहन विभाग किंवा शिवसेनेची भूमिका कोणावरही सक्ती करण्याची नसून, केवळ मराठी शिकावे हा त्यामागचा शुद्ध उद्देश आहे.

"शिकवायला आम्ही सज्ज!"रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी बोलता यावे, ही परिवहन मंत्र्यांची भूमिका योग्यच असल्याचे सांगत सामंत म्हणाले की, "आम्ही त्यांना स्वतःहून शिका असे म्हणत नाही, तर आम्ही त्यांना शिकवायला तयार आहोत. राज्याचे जिल्हाधिकारी किंवा पोलीस अधीक्षक यांनाही मराठीचा पेपर द्यावा लागतो, मग इतरांना मराठी येण्यात वावगे काय?" महाराष्ट्रात राहणाऱ्यांना मराठी भाषा येणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.

चव्हाणांच्या हेलिकॉप्टर कारखान्यावर 'टोला'नांदेडमध्ये ४ हजार कोटींचा हेलिकॉप्टर सुटे भाग तयार करण्याचा कारखाना होणार असल्याची माहिती खासदार अशोक चव्हाण यांनी दिली होती. यावर विचारले असता सामंत यांनी मिश्किलपणे टोला लगावला. "हा कारखाना कुठे आणि केव्हा होणार, याची मला माहिती घ्यावी लागेल. आताच आमदार हेमंत पाटील यांनी मला हे सांगितले, पुढच्या दौऱ्यात यावर सविस्तर बोलतो," असे म्हणत त्यांनी चव्हाणांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Uday Samant defends Marathi language push, criticizes unnecessary misunderstandings.

Web Summary : Uday Samant supports the initiative for Marathi language proficiency, especially for transport workers. He refuted claims of coercion, emphasizing that learning Marathi is essential and instruction will be provided. He also questioned Ashok Chavan's helicopter factory announcement, hinting at a lack of concrete details.
टॅग्स :marathiमराठीTaxiटॅक्सीUday Samantउदय सामंतNandedनांदेड