शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
6
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
7
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
8
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
9
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
10
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
11
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
12
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
13
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
14
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
15
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
16
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
18
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
19
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
20
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे

चार एकर शेतीत घेतले चार लाखांचे उत्पन्न; बिलोलीच्या आधुनिक शेतकऱ्याची किमया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2018 8:26 PM

बिलोलीच्या महसूल सेवकाने मागच्या ४० वर्षापासून स्वत:च्या मेहनतीने कृतीशील शेती करण्याचा ध्येयवेडा प्रयोग केला आहे़ अवघ्या चार एकर शेतीमध्ये तीन पिकांचे चार लाखांचे उत्पादन दरवर्षी काढून एक नवा आदर्श शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे़

- राजेश गंगमवार  

बिलोली (नांदेड ) : एखादी लहान-सहान नोकरी लागली की शेतीला जोड व्यवसाय करून शेती केली जाते़ घरात कमावते झाले की शेती दुसऱ्याला करण्यासाठी किंवा पडीक ठेवण्याची अनेक उदाहरणे आहेत़ पण बिलोलीच्या महसूल सेवकाने मागच्या ४० वर्षापासून स्वत:च्या मेहनतीने कृतीशील शेती करण्याचा ध्येयवेडा प्रयोग केला आहे़ अवघ्या चार एकर शेतीमध्ये तीन पिकांचे चार लाखांचे उत्पादन दरवर्षी काढून एक नवा आदर्श शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे़

येथील माधवराव अंकुशकर १९८० च्या दशकात कोतवाल पदावर रूजू झाले़ सध्या बिलोली तहसील कार्यालयात सेवक म्हणून कार्यरत आहेत़ तुटपुंज्या पगारातच त्यांनी काटकसरीने कुटुंब चालवले़ एका मुलाला एमडी मेडीसीन, तर दुसऱ्याला आयकर अधिकारी बनवले़ दोघेही आज कमावते झाले़ पण लहानपणापासून शेतीचा छंद असलेल्या माधवरावांनी तरूण वयापासूनच नोकरीची सेवा करीत करीत शेतीकडेही लक्ष दिले़ वडिलोपार्जित मिळालेल्या चार एकर कोरडवाहू शेतीचे बागायतीमध्ये रुपांतर केले़ 

बिलोलीच्या शहरालगत असलेल्या सावळी मार्गावरच्या ४ एकर शेतीमधून आठ महिन्यात तीन वेगवेगळ्या पिकांचे उत्पादन ते घेत असतात़ पावसाळी व उन्हाळी भात पीक, गहू तसेच उन्हाळी भुईमुगाची लागवड करून स्वत: मेहनत करण्यात पहाटे ५ पासून शेतात सतत राबराबत असतात़ म्हणूनच अवघ्या ४ एकरमध्ये ४ लाखांचे दरवर्षी उत्पादन घेत आले आहेत़ याच मार्गावरून जाताना शेतीकडे नजर टाकल्यास उन्हाळ्यातही हिरवेगार-निसर्गरम्य परिसर दिसून येतो़ शेतीची आवड, दररोजची मेहनत, वेळेवर पाणीपुरवठा, शेतीची सर्व कामे करताना वयाच्या ५६ व्या वर्षातही कधीच डगमगत नाहीत़ पावसाळा, हिवाळा, उन्हाळा या तिन्ही हंगामात वेगवेगळी पिके घेऊन शेतीप्रधान भारताचे नागरिक असल्याचे उत्तम उदाहरण त्यांच्याकडे पाहून दिसते़ आजही त्यांच्या शेतात तिन्ही पिके डोलत आहेत़ 

एका जबाबदारीने दररोजचे शासन टपाल, समन्स अगदी वेळेवर देऊन संबंधितांची पोच कार्यालयात देणे असा दररोजचा नित्य क्रम आहे़ पण सेवक असूनही मुले अधिकारी झाल्याचा आविर्भाव कधीही दाखवत नाहीत़ चार एकर शेतीमधून चार लाखांचे उत्पादन आठ महिन्यात घेणारे क्वचितच शेतकरी आहेत़ पण शासकीय नोकरी करीत करीत पहाटे पाच पासून तीन तास शेती कामे व नंतर आपली ड्युटी असे करणारे लोक  अपवाद आहेत़ 

कठोर श्रमामुळे मुले उच्च पदावरमुलं उच्च पदावर असली तरी कोणताही मोठेपणा त्यांच्यात दिसून येत नाही़ स्वत:ची शेती करताना लाज कसली असा प्रश्न ते करीत असतात़ आजही महसूल कार्यालयात सेवक पदावर असून खेड्यापाड्यात शासकीय टपाल पोहोचवण्याची त्यांची ड्युटी आहे़ शेतीकडे लक्ष दिल्याने कर्तव्यात कसूर कधीच करीत नाहीत़ कार्यालयीन वेळेत हजर व आपले जवाबदारीचे काम वेळेत पूर्ण असा त्यांचा नियम आहे़ 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रmarket yardमार्केट यार्डMONEYपैसा