शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

दमदार अभिनयामुळे ‘द इंटरव्ह्यू’ ने प्रेक्षकांना ठेवले खिळवून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 00:35 IST

५७ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेच्या अंतिम फेरीत एकापेक्षा एक सरस नाट्यकृतीचा नांदेडकरांना आस्वाद मिळत आहे. स्पर्धेच्या तिसºया दिवशी नवी मुंबईच्या कलाकारांनी सादर केलेले ‘द इंटरव्ह्यू’ हे नाटक लक्षणीय ठरले. प्रभावी सादरीकरणामुळे प्रेक्षकांना शेवटपर्यंत खुर्चीत खिळवून ठेवण्यास सादरकर्ते यशस्वी झाले.

ठळक मुद्देहौशी मराठी नाट्य स्पर्धा : अंतिम फेरीची वाढली रंगत, प्रेक्षकांचाही मिळतोय वाढता प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : ५७ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेच्या अंतिम फेरीत एकापेक्षा एक सरस नाट्यकृतीचा नांदेडकरांना आस्वाद मिळत आहे. स्पर्धेच्या तिसºया दिवशी नवी मुंबईच्या कलाकारांनी सादर केलेले ‘द इंटरव्ह्यू’ हे नाटक लक्षणीय ठरले. प्रभावी सादरीकरणामुळे प्रेक्षकांना शेवटपर्यंत खुर्चीत खिळवून ठेवण्यास सादरकर्ते यशस्वी झाले.येथील शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात श्री शिव समर्थ युनिव्हर्सल असोसिएशनच्या वतीने रमाकांत जाधव दिग्दर्शित आणि मिहीर गोलतकर आणि रमाकांत जाधव यांनी मराठीत रुपांतरित केलेले हे मूळ नाटक सिद्धार्थकुमार यांचे आहे. रंगमंचावर हे नाटक तितक्याच प्रभावीपणे सादर झाले. नाटकात कार्पोरेट जगतातील ताणतणाव, एकमेकांवरील कुरघोडी याबरोबरच आपले स्थान कायम ठेवण्यासाठी वरिष्ठांची मर्जी राखण्यासाठी वाट्टेल ते काम करण्याची तयारी आणि त्यातून झालेला खून यामुळे हे नाट्य धीरगंभीरपणे रंगले.उपस्थित प्रेक्षक शेवटपर्यंत खुर्चीत बसून होता. दरम्यान, दुपारी चार वाजता खाजा अहमद अब्बास आणि सआदत हसन मंटो यांच्या कथेवर आधारित ‘आणि शेवटी प्रार्थना’ हे नाटक सादर झाले. रुपेश पवार यांनी नाट्यरुपांतर आणि दिग्दर्शन केलेल्या व राष्ट्रभाषा परिवार सामाजिक व सांस्कृतिक संस्था नागपूर यांच्या वतीने सादर झालेल्या या नाटकात पहिल्या अंकात एक आणि दुसºया अंकात आणखी एक अशी दोन नाट्य रंगतात.सआदत हसन मंटोचे कथानक हे इनायत नावाच्या मुलीभोवती रंगते. इनायत ही आपल्या उदरनिर्वाहाकरिता टांगा चालविते. परंतु टांगा चालविणे म्हणजे पुरुषांच्या हद्दीत येणे. कारण टांगा चालविण्याचा अधिकार स्त्रियांना नाही आणि घडतेही या मानसिकतेप्रमाणेच.केवळ स्त्री म्हणून तिला टांगा चालविण्याचा परवाना मिळत नाही, परंतु नंतर तिला वेश्या व्यवसायाचा परवाना मिळतो. या नाटकाच्या माध्यमातून समाजाची स्त्रिया विषयीची विचारश्रेणी मांडण्यात आली आहे.कोणतीही स्त्री स्वेच्छेने कधीच वेश्यावृत्ती स्वीकारत नाही. तर समाज तिला त्या मार्गाने जाण्यासाठी परिस्थिती निर्माण करतो. याच नाटकाचे दुसरे कथानक समाजाचा विद्रूप चेहरा समोर आणणारे आहे. गलिच्छ झोपडपट्टीत राहणारा चित्रकार सुंदर चित्र काढून नेहमी स्वत:ला वास्तविकतेपासून दूर ठेवतो. मात्र त्याच्या चित्रात जेव्हा सत्यता येते तेव्हा समाजाचा अक्षरश: पाया हादरल्याचे मांडण्यात आले आहे. या नाटकात २३ कलावंतांनी भूमिका साकारली. प्रेक्षकांनीही कलाकाराच्या अभिनयाला उत्स्फूर्त दाद दिली. नाट्यस्पर्धेला रसिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती़