शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळी सणावर दुष्काळाचे सावट

By admin | Updated: October 22, 2014 13:21 IST

यंदा तालुक्यात दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली असून पावसाअभावी खरीप पिके करपून गेली आहेत. ऐन मोसमात पावसाने दडी मारल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

मुखेड : यंदा तालुक्यात दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली असून पावसाअभावी खरीप पिके करपून गेली आहेत. 

ऐन मोसमात पावसाने दडी मारल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. मूग, उडीद, सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर पिके वाया गेली आहेत. यंदाची दिवाळी शेतकर्‍यांवर दुष्काळाचे सावट घेवून आली आहे. शेतकर्‍यांजवळ पैसा नसल्याने दिवाळीच्या सणातही बाजारात मंदी आली आहे. यावर्षी निसर्गाच्या अवकृपेने पावसाळा झाला नाही. सरासरीपेक्षा केवळ ४0 टक्के पाऊस झाला. पेरणीच्या वेळी कसाबसा झालेल्या पावसानंतर चांगला पाऊस झाला नाही. कधीकधी आलेल्या पावसाच्या सरीवर पिके तग धरून होती. 
पाऊस पडेल या अपेक्षेने शेतकरी पिकावर पैसा खर्च केला, पण परतीचाही पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेली. खरीप पिकापाठोपाठ रबी पिकावर दुष्काळाचे सावट असून परतीचा पाऊस पडला नसल्याने रबी पिकेही घेणे कठीण आहे. उन्हाळ्यात पडते तसे उन पडत असून हिवाळ्यात गरमी होत आहे. शेतकरी चक्क नागवला असून शेतकर्‍यांच्या दिवाळीवर दुष्काळाचे सावट दिसून येत आहे. शेतकर्‍यांपाठोपाठ व्यापारी वर्गही अडचणीत आला असून शेतकर्‍यांजवळ पैसा नसल्याने बाजारपेठा ओसाड पडल्या आहेत. शेतकर्‍यांच्या जिवावर व्यवसाय करणारे कृषी दुकानदार, आडत दुकानदार आर्थिक अडचणीत आला आहे. 
यावर्षी परिस्थिती गंभीर असून विहीर बोअर कोरडे पडले असून आतापासूनच पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शासनाने कोरडा दुष्काळ जाहीर करावा व पीक विमा मंजूर करून जनावरांसाठी चार्‍याची सोय करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. /(वार्ताहर)
■ खरीप हंगामात एकरी १0 क्विंटल उत्पन्न होणार्‍या शेतकर्‍यांना यंदा एकरी १0 पायलीही उत्पन्न मिळाले नाही. दाळी पुरतेही उडीद, मूगाचे उत्पन्न झाले नाही. सोयाबीन पीक शेंग पोकण्याअगोदरच (दाणा धरण्याअगोदर) सुकून गेले. ज्वारीच्या कनिसाची परिस्थितीही बिकट झाली. तर काही ठिकाणी ज्वारी पोटर्‍यात येण्याअगोदरच सुकून गेली, दिवाळीच्या काळात येणारे तुरीचे पिकेही करपून गेली. कापूस पिकाची परिस्थितीही तशीच आहे. यंदा शेतात घातलेल्या बी-बियाणाचे व खताचे पैसे निघणे अवघड झाले आहे.