शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
2
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
3
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
4
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
5
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
6
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
7
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
8
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
9
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
10
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
11
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
12
वैशाख विनायक चतुर्थी २०२६: गणेश पूजन कसे करावे? ‘या’ गोष्टी आवश्यकच; पाहा, सोपा विधी-मान्यता
13
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
14
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
15
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
16
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
17
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
18
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
19
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
20
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षाची आज निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:16 IST

पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या समर्थ सहकारी पॅनेलने जिल्हा बँक निवडणुकीत २१ पैकी १७ जागा जिंकल्या आहेत. ...

पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या समर्थ सहकारी पॅनेलने जिल्हा बँक निवडणुकीत २१ पैकी १७ जागा जिंकल्या आहेत. त्यामध्ये काँग्रेसने सर्वाधिक १२ जागा जिंकल्या असून शिवसेनेला १ तर राष्ट्रवादीचे चार उमेदवार विजयी झालेले आहेत. भाजपचा या निवडणुकीत सुपडासाफ झाला. त्यांना अवघ्या चार जागांवर समाधान मानावे लागले होते. निवडणूक निकाल जाहीर झाल्यापासून बँकेच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे. सर्वाधिक जागा जिंकलेल्या काँग्रेसकडे अध्यक्षपद तर चार जागा जिंकलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे उपाध्यक्षपद जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून माजी आ. वसंतराव चव्हाण यांचे नाव पुढे असून तीन वेळेस आमदार राहिलेल्या चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादीचे चार उमेदवार विजयी झालेले आहेत. त्यात जिल्हाध्यक्ष हरीहरराव भोसीकर यांचाही समावेश आहे. त्यामुळे भोसीकर यांची उपाध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. १६ एप्रिलला दुपारी साडेबारा वाजता नवनियुक्त संचालक मंडळाची बैठक बँकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. लातूर जिल्हा उपनिबंधक जाधव यांची या बैठकीसाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.