शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
3
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
4
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
5
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
6
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
7
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
9
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
10
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
11
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
12
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
13
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
14
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
15
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
16
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
17
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
18
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
19
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
20
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!

Corona Virus : भिक्षा मागून तरूणांनी जमवली मदत; पालावरील भटक्यांना केले जीवनावश्यक वस्तुंचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 5:07 PM

हातावर पोट असणारे भटके रस्त्यावर आले आहेत

 नांदेड: पोटासाठी भटकंती करून उदरनिर्वाह करणा-यांचे संचार बंदीने खूप मोठे हाल होत आहेत. खायला अन्न नाही, बाहेर भिक्षा मागता येईना, हाताला काम अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. जे लोक भिक्षा मागतात अशा या भटक्या बांधवांसाठी जुन्या अर्धापुर शहरातील  तरूणांनी घरोघरी जाऊन धान्य जमा केले. उपाशीपोटी जगणा-या बांधवांना गहू तांदूळ, तेल, तिखट मिरची व मीठ हाळद साबण आदी जीवनावश्यक वस्तुंचे शनिवारी (दि.२८) वाटप करण्यात आले.        अर्धापूर शहरात विविध भागात भटक्यांनी ठाण मांडले आहे.  सुमारे ५५ कुटूंबाला धान्य वाटप कर आला. या मदतीने हातावर पोट असणाऱ्या बांधवांना खुप मोठा आधार मिळाला.        अर्धापूर शहरांत अर्धापूर नांदेड रस्त्याच्या  बाजूला मोकळ्या जागेत मराठवाडासह विदर्भ आदी भागातील भटकंती  करून उदरनिर्वाह  करणारे  मजुर पालामध्ये थांबले आहेत. यात  मुर्तीकार, फोटो, काचेचे मंदिर विकणारे, भिक्षा मागणारे यांचा समावेश आहे. कोरोना मुळे संचार बंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे  सर्व व्यवहार ठप्प झाले आहे. हाताला काम नाही, पोटाला अन्न नाही अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.    या पालामध्ये राहणाऱ्या बांधवांसाठी  पुण्यजागर प्रकल्पाचे जिल्हा समन्वयक लक्ष्मीकांत मुळे,  गजानन मेटकर, गुणवंत विरकर, नाना डक, शिवराज भुसारे यांनी जुन्या अर्धापुर शहरातील वाडीकर गल्ली,रामनगर, गवळीगल्ली, ब्राह्मण गल्ली, केशव राज नगर आदी भागात जाऊन धान्य जमा केले. या मदत फेरीवाला नागरिकांनी खुप मोठा प्रतिसाद दिला. भटक्यांच्या पालावर जावून जीवनावश्यक वस्तुंचे  वाटप करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक विष्णूकांत गुट्टे, आरोग्य अधिकारी  मदन डाके, सुहास गायकवाड,  रामलींग महाजन आदी उपस्थित होते. या मदत फेरीत सुरेश डक, आकाश गव्हाणे,  शिवाजी पवार, बलवीर देशमुख, नवनाथ राऊत, लक्ष्मण गाढवे यांनी सहभाग नोंदविला. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNandedनांदेड