शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
2
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
3
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
4
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
5
'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप
6
Viral Video: लेकीच्या मॉइश्चरायझरची किंमत ऐकून वडिलांची उडाली झोप, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा!
7
अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट
8
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
9
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
10
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
11
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
12
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
13
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
14
'हिरव्या पतंगाचा मांजा भगवा तर धनुष्याचा बाण हिरवा, भाजपा, शिंदेसेना आणि MIM एकच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
15
थ्रिलर फिल्मपेक्षाही भयंकर! जावयासोबत सासूचं सूत जुळलं, अडसर ठरणाऱ्या नवऱ्यालाच संपवलं
16
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, महापालिका निवडणुकीत नवा वाद; प्रचार संपला तरीही उमेदवारांना...
17
गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढलं, तीन दिवसंपासून घसरतोय हा शेअर; आजही 5.58% आपटला, काय म्हणतात एक्सपर्ट?
18
एका दिवसात १ लाख कोटींचा धुराळा! टाटांच्या 'या' कंपनीचा शेअर धडाम; संक्रांतीपूर्वीच गुंतवणूकदारांना 'धक्का'
19
ना भिंतीवर पोस्टर, ना रॅली, ना फ्लेक्सबाजी; जपानची निवडणूक पद्धत पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
20
T20 Word Cup: ४ परदेशी खेळाडूंना भारताचा व्हिसा नाकारला; 'पाकिस्तान कनेक्शन' पडले महागात
Daily Top 2Weekly Top 5

सुप्त संघर्षातून नांदेडमध्ये शिंदेसेनेकडून अशोक चव्हाण टार्गेट; भाजपची मात्र संयमी प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 11:46 IST

जिल्ह्यात १२ नगरपरिषदा आणि एका नगरपंचायतीची निवडणूक असली तरी, सर्वांचे लक्ष हे खासदार अशोकराव चव्हाण यांची कन्या आमदार श्रीजया चव्हाण यांच्या भोकर, मुदखेडकडे

- शिवराज बिचेवार

नांदेड- महायुतीत भाजप आणि शिवसेनेच्या राज्यपातळीवरील नेत्यांमध्ये काही दिवसांपासून सुप्त संघर्ष सुरू झाला आहे. या संघर्षाचे पडसाद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही उमटत आहेत. नांदेड जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांकडून युती तोडण्यासाठी खासदार अशोकराव चव्हाण हेच कारणीभूत असल्याचा आरोप केला जात असताना प्रचारासाठी आलेल्या शिंदेसेनेच्या मंत्र्यांकडूनही भाजपाचे जिल्ह्यातील नेतृत्वच टार्गेट केले जात आहे. याउलट, भाजपाकडून मात्र सध्या तरी संयमाने प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.

जिल्ह्यात १२ नगरपरिषदा आणि एका नगरपंचायतीसाठी निवडणूक सुरू आहे. या निवडणुकीच्या प्रचारात महायुती सुसाट सुटली असली तरी महाविकास आघाडीचे मात्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ वगळता कुणीही जिल्ह्यात फिरकले नाही. प्रचारासाठी आता शेवटचे तीन दिवस उरले आहेत. परंतु, महायुतीत शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून भाजपावरच सर्वाधिक टीकेची झोड उठविली जात आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार हेमंत पाटील, राष्ट्रवादीचे प्रतापराव चिखलीकर हे खासदार अशोकराव चव्हाण यांच्यावर टीकेची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. तर दुसरीकडे शिंदे सेनेच्या राज्य पातळीवरील नेत्यांचेही मुख्य लक्ष्य हे अशोकराव चव्हाण हेच आहेत. मंत्री संजय शिरसाठ, गुलाबराव पाटील, खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडूनही चव्हाणांवर टीका करण्यात आली. खासदार चव्हाण यांच्याकडून मात्र आरोप-प्रत्यारोप आणि कुरघाेड्या करून विकास करता येत नाही, असे म्हणत सकारात्मक भूमिका घेऊन चालत असल्याची संयमी प्रतिक्रिया येत आहे.

सर्वांचे लक्ष भोकर, मुदखेड आणि लोहा-कंधारवरजिल्ह्यात १२ नगरपरिषदा आणि एका नगरपंचायतीची निवडणूक असली तरी, सर्वांचे लक्ष हे खासदार अशोकराव चव्हाण यांची कन्या आमदार श्रीजया चव्हाण यांच्या भोकर, मुदखेड आणि राष्ट्रवादीचे आमदार प्रतापराव चिखलीकरांच्या मतदारसंघातील लोहा-कंधार या नगरपरिषदेच्या निवडणुकीकडे लागले आहे. त्यात लोहा-कंधार नगरपरिषदेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभा झाल्या आहेत. दोन्ही नेत्यांचा सर्वाधिक वेळ या चार नगरपरिषदांमध्ये प्रचारासाठी जात आहे.

मुदखेडमध्ये भाजपा-काँग्रेस, भोकर-भाजपा-काँग्रेस-राष्ट्रवादी, देगलूर-काँग्रेस-राष्ट्रवादी, हिमायतनगर-काँग्रेस-भाजपा-शिवसेना (शिंदे), हदगाव- भाजप आणि शिंदेसेना एकत्र, तर दोन्ही राष्ट्रवादींचा घरोबा, काँग्रेस आणि उबाठा स्वतंत्रपणे रिंगणत, धर्माबाद- मराठवाडा जनहित पार्टी-राष्ट्रवादी-भाजपा- शिवसेना, कुंडलवाडी- शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी, लोहा- राष्ट्रवादी-भाजप, कंधार- भाजप-राष्ट्रवादी-काँग्रेस, किनवटमध्ये-भाजपा-शिवसेनेची युती, उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांची आघाडी. काँग्रेस स्वतंत्रपणे रिंगणात उतरली आहे. बिलोली येथे मराठवाडा जनहित पार्टी-राष्ट्रवादी-काँग्रेस-शिवसेना (शिंदे गट), मुखेड- भाजपा आणि शिवसेना (शिंदे गट) तर उमरीत भाजपा आणि राष्ट्रवादीत लढत होणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Internal strife: Shinde's Sena targets Ashok Chavan in Nanded.

Web Summary : Nanded witnesses political turmoil as Shinde's Sena targets Ashok Chavan, alleging he disrupted alliances. Local elections reveal internal struggles within the ruling coalition. BJP remains restrained, while all eyes are on key municipal polls.
टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणBJPभाजपाShiv SenaशिवसेनाShrikant Shindeश्रीकांत शिंदेSanjay Shirsatसंजय शिरसाटGulabrao Patilगुलाबराव पाटीलMunicipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक