शहरं
Join us  
Trending Stories
1
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
2
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
3
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
4
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
5
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
6
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
7
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
8
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
9
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
10
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
11
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
12
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
13
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
14
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
15
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
16
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
17
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
18
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
19
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
20
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!

लोहा तालुक्यातील ६० कोटींच्या धोंड सिंचन प्रकल्पास मंजूरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 12:32 AM

लोहा तालुक्यातील माळाकोळी जिल्हा परिषद सर्कलमधील आष्टूर परिसराला वरदान ठरणाऱ्या ५९ कोटी ४७ लाख रुपये किंमतीच्या धोंड साठवण तलावास राज्य शासनाने मंजूरी दिली आहे. सदर प्रकल्पाचे काम आगामी तीन वर्षात पूर्ण करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री ना.गिरीष महाजन यांनी संबंधित विभागाला दिल्याची माहिती आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिली. मागील 30 वषार्पासून सदर प्रकल्पाची मागणी होत होती.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांचे आदेश : तीन वर्षात प्रकल्प पूर्ण करा

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : लोहा तालुक्यातील माळाकोळी जिल्हा परिषद सर्कलमधील आष्टूर परिसराला वरदान ठरणाऱ्या ५९ कोटी ४७ लाख रुपये किंमतीच्या धोंड साठवण तलावास राज्य शासनाने मंजूरी दिली आहे. सदर प्रकल्पाचे काम आगामी तीन वर्षात पूर्ण करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री ना.गिरीष महाजन यांनी संबंधित विभागाला दिल्याची माहिती आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिली. मागील 30 वषार्पासून सदर प्रकल्पाची मागणी होत होती.पालम व लोहा तालुक्याच्या सीमेवरील प्रस्तावित धोंड सिंचन प्रकल्पास राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळात नाशिक येथील कार्यालयातून पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मंजूर झाले होते. या प्रकल्पात ९.०१ दलघमी पाणी साठा उपलब्ध होणार आहे. पाणीसाठ्यामुळे माजलगांव उजवा कालव्यावरुन लोहा-पालम परिसरातील १७५० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. त्याचा सर्वाधिक लाभ लोहा तालुक्यातील आष्टूर, लव्हराळा, रिसनगांव, रामतीर्थ, मुरंबी, सावरगांव आदि दहा गावांना होणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंधार येथील दौºयात धोंड साठवण तलावासह किवळा साठवण तलाव, लिंबोटी धरणाच्या उर्वरीत कामासाठी निधी मंजूर करण्याची घोषणा केली होती. याबरोबरच जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांना स्वतंत्र बैठक घेवून हा प्रश्न निकाली काढण्याचे आदेश दिले होते. २२ फेब्रवारी रोजी जलसंपदा मंत्र्यांनी आपल्या दालनात बैठक घेवून धोंड साठवण तलावास 60 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. लिंबोटी धरणास ७३ कोटी तर किवळा साठवण तलावास ४५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मुंबई येथे झालेल्या या बैठकीस आ. प्रतापराव पाटील चिखलीकर, सेवानिवृत्त सनदी अधिकारी श्यामसुंदर शिंदे, जि.प.सदस्य प्रविण पाटील चिखलीकर, चंद्रशेन पाटील, लोहा तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष गणेश सावळे यांच्यासह पाटबंधारे विभागातील अधिकाºयांची उपस्थिती होती.लवकरच या प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ होणार असल्याचेही चिखलीकर यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस केशवराव पाटील आष्टूरकर, जि.प. सदस्या प्रणिताताई देवरे, चंद्रशेन पाटील, गणेश सावळे, लोहा पंचायत समितीचे उपसभापती बालाजी पाटील, शरद पवार, लोह्याचे माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार आदिंची उपस्थिती होती.

टॅग्स :DamधरणGirish Mahajanगिरीश महाजनWaterपाणीMONEYपैसा